घटना


१६८७: सर आयझॅक न्यूटन यांनी फिलोसॉफी नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.

१८११: व्हेनेझुएलाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१८३०: फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला.

१८४१: थॉमस कुक यांनी लेस्टर ते लोफबरो अशी पहिली सहल आयोजित केली.

१८८४: जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला.

१९०५: लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.

१९१३: बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली.

१९४६: फ्रान्स फॅशन शोमध्ये पदार्पण केल्यानंतर बिकिनीची विक्री सुरु.

१९५०: इस्रायलच्या क्वेन्सेटने जगातील ज्यू व्यक्तीला इस्रायलमध्ये राहण्याचा हक्क दिला.

१९५४: आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना.

१९५४: बीबीसीने पहिले टेलिव्हिजन बातम्या बुलेटिन प्रसारित केले.

१९६२: अल्जीरीयाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले

१९७५: देवी या रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.

१९७५: केप व्हर्डेला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९७५: विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकणारा आर्थर अ‍ॅश हे पहिले कृष्णवर्णीय खेळाडू बनले.

१९७७: पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव. झुल्फिकार अली भुत्तो तुरुंगात.

१९८०: स्वीडन टेनिसपटू ब्योर्न बोरग यांनी विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा सलग पाच वेळा जिंकली.

१९९६: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि एन. पंत यांना आर्यभट्ट पुरस्कार जाहीर.

१९९७: स्वित्झर्लंडच्या १६ वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्होत्नाला पराभूत करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली.

२००९: अँडी रॉडीकला विम्बल्डनमधे पराभूत करुन रॉजर फेडररने विक्रमी १५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.

२०१२: ३१० मीटर (१०२० फूट) उंचीसह लंडनमधील द शर्ड ही युरोपमधील सर्वात उंच इमारत ठरली.


जन्म

१८८२: हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक हजरत इनायत खाँ यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२७)

१९१८: केंद्रीय उद्योगमंत्री आणि केरळचे मुख्यमंत्री के. करुणारन यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१०)

१९२०: साहित्यिक आनंद साधले यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९९६)

१९२५: केंद्रीय मंत्री आणि गुजरातचे राज्यपाल नवल किशोर शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर २०१२)

१९४६: केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे खासदार रामविलास पासवान यांचा जन्म.

१९५२: चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक रेणू सलुजा यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट २००० – मुंबई)

१९५४: न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक जॉन राइट यांचा जन्म.

१९६८: युट्युब चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान वॉजिकी यांचा जन्म.

मृत्यू

१८२६: सिंगापूरचे संस्थापक सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १७८१)

१८३३: जगातील पहिले परिचित असलेला फोटो काढणारे निकेफोरे निओपे यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १७६५)

१९४५: ऑस्ट्रेलियाचे १४ वे पंतप्रधान जॉन कर्टिन यांचे निधन.

१९५७: भारतीय वकील आणि राजकारणी अनुग्रह नारायण सिन्हा यांचे निधन. (जन्म: १८ जून १८८७)

१९९६: रहस्यकथाकार बाबूराव अर्नाळकर यांचे निधन.

२००५: लेगस्पिन गोलंदाज बाळू गुप्ते यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९३४)

२००६: भारतीय कवी आणि विद्वान थिरुल्लालु करुणाकरन यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९२४)

जुलै

रवि 5 12 19 26
सोम 6 13 20 27
मंगळ 7 14 21 28
बुध 1 8 15 22 29
गुरु 2 9 16 23 30
शुक्र 3 10 17 24 31
शनि 4 11 18 25