दैनंदिन दिनविशेष - ६ जुलै


घटना

१७३५: मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.

१७८५: डॉलर हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले.

१८८५: लुई पाश्चर यांनी रेबीज या रोगावरील लसीची यशस्वी चाचणी केली.

१८९२: ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांची निवड झाली.

१९०८: रॉबर्ट पियरी यांची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली.

१९१०: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची पुणे येथे स्थापना.

१९३९: जर्मनीतील ज्यू व्यक्तींचे उरले सुरले उद्योगधंदे बंद करण्यात आले.

१९४७: रशियात एके-४७ या बंदुकांच्या उत्पादनास सुरुवात झाली.

१९८२: पुणे – मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.

२००६: चीनयुद्धापासून बंद असलेली भारत तिबेट जोडणारी नाथूला ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.


जन्म

१७८१: सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै १८२६)

१८३७: प्राच्यविद्या संशोधक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑगस्ट १९२५)

१८६२: मानववंशशास्रज्ञ एल. के. अनंतकृष्ण अय्यर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९३७)

१८८१: विदर्भातील संत गुलाबराव महाराज यांचा जन्म. (मृत्यू: २० सप्टेंबर १९१५)

१८९०: भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी जन्म. (मृत्यू: १४ जुलै १९३६)

१९०१: केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९५३)

१९०५: राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७८)

१९१४: डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) चे संस्थापक विन्स मॅकमोहन सिनियर यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १९८४)

१९२०: अर्थतज्ञ डॉ. विनायक महादेव तथा वि. म. दांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९५)

१९२७: लेखक, चित्रकार, पटकथाकार आणि शिकारी व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट २००१)

१९३०: दाक्षिणात्य संगीताचे गायक पद्मश्री आणि पद्मविभूषण डॉ. एम. बालमुरलीकृष्णन यांचा जन्म.

१९३५: चौदावे अवतार दलाई लामा यांचा जन्म.

१९३९: भारतीय क्रिकेट खेळाडू मनसूद यांचा जन्म.

१९४६: अमेरिकेचे ४३वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांचा जन्म.

१९४६: अभिनेता सिल्व्हेस्टर स्टॅलोन यांचा जन्म.

१९५२: मराठी साहित्यिक रेखा शिवकुमार बैजल यांचा जन्म.

१९६१: भारतीय राजकारणी आणि वकील वंदना चव्हाण यांचा जन्म.

१९७५: अमेरिकन रॅपर, निर्माते आणि अभिनेते ५० सेंट यांचा जन्म.

१९८६: तम्ब्लर चे संस्थापक डेव्हिड कार्प यांचा जन्म.


मृत्यू

१८५४: जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १७८९)

१९८६: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, केंद्रीय मंत्री आणि उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९०८)

१९९७: हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक चेतन आनंद यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १९२१)

१९९९: कसोटी क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९३९)

२००२: भारतीय उद्योगपती धीरुभाई अंबानी यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९३२)\

२००४: ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष थॉमस क्लेस्टिल यांचे निधन.

जुलै

रवि 5 12 19 26
सोम 6 13 20 27
मंगळ 7 14 21 28
बुध 1 8 15 22 29
गुरु 2 9 16 23 30
शुक्र 3 10 17 24 31
शनि 4 11 18 25

Post a comment

0 Comments