घटना

१४९७: वास्को द गामा युरोपातून भारताच्या पहिल्या सफरीवर निघाला.

१८५६: चार्ल्स बर्न यांना मशीनगन चे अमेरिकेतील पेटंट मिळाले.

१८८९: द वॉल स्ट्रीट जर्नलचा पहिला अंक प्रकाशित झाला.

१९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ’मोरिया’ या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.

१९३०: किंग जॉर्ज-५वे यांच्या हस्ते लंडनमध्ये  इंडिया हाऊसचे उद्‍घाटन झाले.

१९५८: बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात दो आँखे बारह हाथ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.

१९९७: बीजिंग येथील आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकावले.

२००६: मुख्यनिवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

२०११: रुपयाचे नवीन चिन्ह (Rs.) असलेली नाणी चलनात आली.


जन्म

१७८९: मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १८५८)

१८३१: कोकाकोला चे निर्माते जॉन पंबरटन यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १८८८)

१८३९: रॉकफेलर घराण्यातील पहिला उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचा संस्थापक जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९३७)

१८८५: ह्यूगो बॉस चे स्थापक ह्यूगो बॉस यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट १९४८)

१९१४: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१०)

१९१६: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार गो. नी. दांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९९८)

१९२२: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २००९)

१९४९: आंध्र प्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचा जन्म.

१९७२: भारताचे क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांचा जन्म.

मृत्यू

१६९५: डच गणितज्ञ, खगोलविद आणि पदार्थवैज्ञानिक क्रिस्टियन हायगेन्स यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १६२९)

१८३७: इंग्लंडचा राजा विल्यम (चौथा) यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १७६५)

१९६७: ब्रिटिश अभिनेत्री विवियन ली यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९१३)

१९८४: पद्मश्री विजेते गोमंतकीय कवी ‘बाकीबाब’ उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १९१० )

१९९४: उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किमसुंग २रे यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९१२)

१९९४: मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक गोवा पुराभिलेखचे संचालक डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे यांचे निधन.

२००१: प्रसिद्ध तबला वादक उस्ताद बाबासाहेब मिरजकर याचे निधन.

२००३: संत साहित्याचे अभ्यासक ह. श्री. शेणोलीकर यांचे निधन.

२००६: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक लेखक प्रा. राजा राव यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९०८)

२००७: भारताचे ८वे पंतप्रधान चंद्रा शेखर यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९२७)

२००८: महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचे निधन.

२०१३: भारतीय लेखक सुन्द्री उत्तमचंदानी यांचे निधन. (जन्म: २८ सप्टेंबर १९२४)

जुलै

रवि 5 12 19 26
सोम 6 13 20 27
मंगळ 7 14 21 28
बुध 1 8 15 22 29
गुरु 2 9 16 23 30
शुक्र 3 10 17 24 31
शनि 4 11 18 25