dinvishesh 13 july

घटना


१६६०: पावनखिंडीतील लढाई.

१८३७: राणी व्हिक्टोरिया बकिंगहॅम पॅलेस मध्ये राहायला गेली. तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजाचे/राणीचे अधिकृत निवासस्थान बनले.

१८६३: सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला.

१९०८: ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.

१९२९: जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणातच त्यांचा मृत्यू झाला.

१९५५: २८ वर्षीय रुथ एलिसला प्रियकराचा खून केल्याबद्दल फाशी दिली. ग्रेट ब्रिटनमधली स्त्रीकैद्याची अखेरची फाशी ठरली.

१९७७: रोहित्रावर वीज पडल्यामुळे न्यूयॉर्क शहरातील वीजपुरवठा २४ तास खंडित झाला.

१९८३: श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. ३,००० तामिळ व्यक्तींची हत्या. ४,००,००० हून अधिक तामिळींचे पलायन.

२०११: मुंबई शहरात बॉम्बस्फोटांत २६ जण ठार, तर १३० जण जखमी.

जन्म

१८९२: जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९७७)

१९४२: अमेरिकन अभिनेता हॅरिसन फोर्ड यांचा जन्म.

१९४४: रुबिक क्यूब चे निर्माते एरो रुबिक यांचा जन्म.

१९५३: वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू लॅरी गोम्स यांचा जन्म.

१९६४: भारतीय क्रिकेट खेळाडू उत्पल चॅटर्जी यांचा जन्म.


मृत्यू

१६६०: पावनखिंड लढवून बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी आपल्याल प्राणाचे बलिदान दिले.

१७९३: फ्रेंच क्रांतिकारी ज्याँपॉल मरात यांचे निधन.

१९६९: तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक महर्षी न्यायरत्‍न धुंडिराजशास्त्री विनोद यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९०२)

१९८०: बोत्स्वानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सेरेत्से खामा यांचे निधन.

१९९०: क्रीडा समीक्षक व समालोचक अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ बॉबी तल्यारखान यांचे निधन.

१९९४: धृपद गायक, संगीतकार शिक्षक पं.के. जी. गिंडे यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९२५)

२०००: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका इंदिरा संत यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९१४)

२००९: हिंदी मराठी चित्रपट अभिनेते निळू फुले यांचे निधन.

२०१०: सुप्रसिद्ध सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १९३१)

जुलै

रवि 5 12 19 26
सोम 6 13 20 27
मंगळ 7 14 21 28
बुध 1 8 15 22 29
गुरु 2 9 16 23 30
शुक्र 3 10 17 24 31
शनि 4 11 18 25