घटना

१८७३: मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.

१८७४: इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मांजर शिरल्यामुळे सभागृहाचे कामकाज थांबले.

१८७७: विंबल्डन चॅम्पियनशिप सुरु झाली.

१८९३: डॉ. डॅनियल हेल यांनी जगातील पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिकागो येथे यशस्वी केली.

१९५१: भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.

१९६९: वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला.

२०००: अमेरिकेच्या पीट सॅम्प्रस यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धा सातव्यांदा जिंकत तेरावे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावून रॉय इमर्सन यांचा बारा ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम मागे टाकला.

२०११: सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती.

जन्म

१६८९: फ्रेंच लेखक अॅलेक्सिस पिरॉन यांचा जन्म.

१७२१: जर्मन लेखक योहान निकोलॉस गोत्झ यांचा जन्म.

१८१९: शिवणयंत्राचा संशोधक एलियास होव यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १८६७)

१९२१: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९८२)

१९२५: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ गुरूदत्त यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर १९६४)

१९२६: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ बेन मॉटलसन यांचा जन्म.

१९३०: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक के. बालाचंदर यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१४)

१९३८: चित्रसृष्टीतील कसदार अभिनेता हरी जरीवाला ऊर्फ संजीव कुमार यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८५)

१९४४: भारतीय-इंग्रजी इतिहासकार आणि शैक्षणिक जूडिथ एम. ब्राउन यांचा जन्म.

१९५०: युक्रेन चे पंतप्रधान व्हिक्टर यानुकोविच यांचा जन्म.

१९७१: नेटस्केप चे सहसंस्थापक मार्क अँडरसन यांचा जन्म.

मृत्यू

१८५६: इटालियन रसायनशास्त्रज्ञ अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १७७६)

१९३२: अमेरिकन संशोधक आणि उद्योजक किंग कँप जिलेट यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १८५५)

१९६८: सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८९६)

१९९३: संगीतकार जोडीतील सोनिक यांचे निधन.

२००५: महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री डॉ. रफिक झकारिया यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९२०)

जुलै

रवि 5 12 19 26
सोम 6 13 20 27
मंगळ 7 14 21 28
बुध 1 8 15 22 29
गुरु 2 9 16 23 30
शुक्र 3 10 17 24 31
शनि 4 11 18 25