घटना


१७९१: फ्रेन्च संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले.

१८३७: भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.

१८८०: थॉमस एडिसनने विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू केला.

१८९१: स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना झाली.

१९४३: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी नेपल्स शहरावर ताबा मिळवला.

१९४६: युनायटेड किंग्डममधे मेन्सा इंटरनॅशनल या संस्थेची ची स्थापना झाली.

१९४९: संगीत रंगभूमीवरील गायक,अभिनेते जयराम शिलेदार यांनी स्वत:ची मराठी रंगभूमी नाट्यसंस्था स्थापन केली.

१९५८: भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.

१९५९: भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९६०: नायजेरियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९६९: कॉनकॉर्ड विमान प्रथमच ध्वनीगती पेक्षा जोरात उडण्यात यशस्वी झाले.

१९७१: अमेरिकेतील वॉल्ट डिस्ने वर्ल्ड सुरु झाले.

१९८२: सोनी कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर प्रकाशित केले.

१९९२: कार्टून नेटवर्क सुरु झाले.

२००२: भारतीय दंड संहिता, मोटार वाहन कायदा, १९८८ आणि मुंबई प्रतिबंधक कायदा १९४९ अंतर्गत सलमान खान वर गुन्हा दाखल. तसेच मुंबई पोलिसांनी सलमान विरुद्ध भारतीय दंड संहिता कला ३०४(भाग-२) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

२००५: इंडोनेशियातील बाली बेटांवर बॉम्बस्फोटांत १९ जण ठार झाले.


जन्म


१८४७: थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या अ‍ॅनी बेझंट यांचा जन्म. (मृत्यू: २० सप्टेंबर १९३३)

१८८१: बोईंग विमान कंपनीचे संस्थापक विल्यम बोईंग यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९५६)

१८९५: पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १९५१)

१९०६: संगीतकार व गायक सचिन देव बर्मन यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९७५)

१९१९: गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १९७७)

१९१९: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी मजरुह सुलतानपुरी यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे २०००)

१९२४: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचा जन्म.

१९२८: दाक्षिणात्य अभिनेते विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै २००१)

१९३०: कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २०००)

१९८४: भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते चिरंजीवी सर्जा यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून २०२०)


मृत्यू



१८६८: थायलंडचा राजा मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १८०४)

१९३१: नाट्यछटाकार शंकर काशिनाथ गर्गे तथा दिवाकर यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १८८९)

१९५९: इटलीचे पहिले अध्यक्ष इरिको डी निकोला यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १८७७)

१९९७: जगातील सर्वात बुटकी व्यक्ती (२२.१”) गुल मोहम्मद यांचे निधन.

२०२०: भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते चिरंजीवी सर्जा यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९८४)


ऑक्टोबर

रवि 4 11 18 25
सोम 5 12 19 26
मंगळ 6 13 20 27
बुध 7 14 21 28
गुरु 1 8 15 22 29
शुक्र 2 9 16 23 30
शनि 3 10 17 24 31