घटना


१८६८: पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन येथे पहिले वाहतुक नियंत्रक दिवे (traffic signals) बसवण्यात आले.

१९०१: नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.

१९०६: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत.

१९१६: संगीत स्वयंवर या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१९७८: ईस्त्रायलचे अध्यक्ष मेनाकेम बेगिन आणि सीरीयाचे अध्यक्ष अन्वर सादात यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१९९८: अर्थशास्त्र मध्ये नोबेल पारितोषिक अर्थतज्ञ प्रा. अमर्त्य सेन यांना प्रदान.

२००३: भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी कसोटी क्रिकेट मध्ये ३५वे शतक केले.

२०१४: भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.

२०१५: सालमन खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता.


जन्म


१८७०: इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९५८)

१८७८: स्वतंत्र पक्षाचे संस्थापक चक्रवर्ती राजगोपालचारी यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९७२)

१८८०: प्राच्यविद्यापंडित श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९६७ – पुणे)

१८९२: मराठी नाट्य-अभिनेते आणि गायक बापूराव पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: १५ मार्च १९३७)

१९०८: भारतीय पुरातत्वावेत्ते हसमुख धीरजलाल सांकलिया यांचा जन्म.

१९५७: भारतीय-अमेरिकन गुरू आणि शिक्षक प्रेमा रावत यांचा जन्म.



मृत्यू



१८९६: स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचे निधन. (जन्म: २१ ऑक्टोबर १८३३)

१९२०: डॉज मोटर कंपनी चे एक संस्थापक होरॅस डॉज यांचे निधन. (जन्म: १७ मे १८६८)

१९५३: भारतीय-इंग्रजी विद्वान आणि अनुवादक अब्दुल्ला यूसुफ अली यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १८७२)

१९५५: प्रज्ञावंत भाष्यकार आणि गांधीवादी तत्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा इस्लामपूर येथे दम्याच्या विकाराने निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८९४)

१९६३: इतिहास पंडित सरदार के. एम. पणीक्कर यांचे निधन. (जन्म: ३ जून १८९५)

१९६४: ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १९०५)

१९९९: क्रोएशिया देशाचे पहिले अध्यक्ष फ्रांजो तुुममन यांचे निधन. (जन्म: १४ मे १९२२)

२००१: चित्रपट अभिनेते अशोक कुमार गांगुली उर्फ दादामुनी यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९११)

२००३: संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे निधन.

२००९: लेखक आणि कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९३८)


>

डिसेंबर

रवि 6 13 20 27
सोम 7 14 21 28
मंगळ 1 8 15 22 29
बुध 2 9 16 2330
गुरु 3 10 17 24 31
शुक्र 4 11 18 25
शनि 5 12 19 26