10 july dinvishesh


घटना

१८९०: वायोमिंग अमेरिकेचे ४४ वे राज्य बनले.

१९१३: कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅलीमध्ये तापमान १३४ अंश फूट (५७ अंश सेल्सिअस) पर्यंत वाढले, जे पृथ्वीवरील सर्वात उच्च तापमानाचे रेकॉर्ड आहे.

१९२३: मुसोलिनी यांनी इटलीतील सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली.

१९२५: अवतार मेहेरबाबा यांनी मौनव्रताची सुरुवात केली सलग ४४ वर्षे हे व्रत मृत्यूपर्यंत पाळले.

१९२५: तास या सोवियेत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना झाली.

१९४०: बॅटल ऑफ ब्रिटन या नावाने ओळखले जाणारे हवाईयुद्ध सुरू झाले.

१९४७: मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल झाले.

१९६२: टेलस्टार-१ हा पहिला अमेरिकन दळणवळण उपग्रह प्रक्षेपित केला.

१९७३: पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशला मान्यता दिली.

१९७३: बहामाज देशाला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९७८: मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना झाली.

१९७८: मॉरिटानियात लष्करी उठाव झाला.

१९९२: मादकद्रव्यांच्या तस्करीबद्दल पनामाचे माजी राष्ट्राध्यक्ष मॅन्युएल नोरिएगा यांना ३० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.

१९९२: आर्वी येथील विक्रम इनसॅट भू-केंद्र राष्ट्राला अर्पण केले.

१९९२: संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या इन्सॅट-२ए या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण झाले.

१९९५: म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या प्रणेत्या आंग सान सू क्यी यांची ६ वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त मुक्तता करण्यात आली.

२०००: मनुभाई मेहता पुरस्कार शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर.

२०००: नायजेरियात एका फुटलेल्या तेलवाहिनीत स्फोट होऊन गळणारे तेल गोळा करण्यासाठी आलेले २५० जण जळुन ठार झाले.


जन्म

१९०३: साहित्यिक रा. भि. जोशी यांचा जन्म.

१९१३: कवयित्री पद्मा गोळे यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी १९९८)

१९१४: सुपरमॅन हिरो चे सहनिर्माते जो शस्टर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९२)

१९२१: स्माईली चे निर्माते हार्वे बॉल यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल २००१)

१९२३: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १९८७)

१९३४: पद्मभूषण विजेते जामखेड मॉडेल चे जनक डॉ. रजनीकांत आरोळे यांचा सुपे अहमदनगर येथे जन्म.

१९४०: अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्डस चे सभासद लॉर्ड मेघनाद देसाई यांचा जन्म.

१९४३: अमेरिकन टेनिस खेळाडू आर्थर अ‍ॅश यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९९३)

१९४५: इंग्लिश टेनिस खेळाडू व्हर्जिनिया वेड यांचा जन्म.

१९४९: क्रिकेटपटू समालोचक सुनील गावसकर यांचा जन्म.

१९५०: पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना यांचा जन्म.


मृत्यू


१५५९: फ्रान्सचा राजा हेन्‍री (दुसरा) यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १५१९)

१९६९: इतिहासकार डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचे निधन. (जन्म: ३० मे १८९४)

१९७०: आईसलँडचे पंतप्रधान ब्यार्नी बेनेडिक्ट्सन यांचे निधन.

१९७१: भोजपुरी भाषेचे शेक्सपिअर भिखारी ठाकूर यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १८८७)

१९८९: साम्यवादी विचारवंत साहित्यिक प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांचे निधन.

१९९५: गरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध डॉ. रामकृष्ण विष्णू केळकर यांचे निधन.

२०००: भारतीय पत्रकार आणि राजकारणी वक्कम मजीद यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९०९)

२००५: पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १९३१)

२०१३: भारतीय लेखक आणि शैक्षणिक गोकुलानंद महापात्रा यांचे निधन. (जन्म: २१ मे १९२२)

२०१४: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शक जोहरा सेहगल यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १९१२)

जुलै

रवि 5 12 19 26
सोम 6 13 20 27
मंगळ 7 14 21 28
बुध 1 8 15 22 29
गुरु 2 9 16 23 30
शुक्र 3 10 17 24 31
शनि 4 11 18 25