घटना


१८५२: युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी या ऑस्ट्रेलियातील विद्यापीठची स्थापना.

१९८७: श्रीलंकेत भारतीय पीस रक्षक फोर्सद्वारे ऑपरेशन पवन ची सुरवात झाली.

२००१: व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर.

२००१: पोलरॉईड कार्पोरेशनने दिवाळखोरी जाहीर केली.


जन्म


१८७६: बंगाली कथालेखक व कादंबरीकार चारुचंद्र बंदोपाध्याय यांचा चांचल, माल्डा, बांगला देश येथे जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९३८ – कलकत्ता)

१९०२: स्वातंत्र्यसैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९७९ – पाटणा, बिहार)

१९१६: पद्मविभूषण समाजसुधारक चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी २०१०)

१९१६: चित्रपट व नाट्य अभिनेत्री रतन पेडणेकर ऊर्फ मीनाक्षी शिरोडकर यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९९७)

१९३०: पत्रकार व स्तंभलेखक बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ बिझी बी यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल २००१)

१९३२: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक सुरेश दलाल यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट २०१२)

१९४२: चित्रपट अभिनेते व निर्माते अमिताभ बच्चन यांचा जन्म.

१९४३: वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू कीथ बॉईस यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १९९६)

१९४६: परम सुपरकॉम्पुटर आणि सी. डॅक चे निर्माते आणि संस्थापक विजय भटकर यांचा जन्म.

१९५१: हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुकूल आनंद यांचा जन्म.

 

मृत्यू



१८८९: ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रेस्कॉट ज्यूल यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १८१८)

१९६८: माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९०९)

१९८४: आक्रमक डावखुरे फलंदाज खंडेराव मोरेश्वर ऊर्फ खंडू रांगणेकर यांचे निधन. (जन्म: २७ जून १९१७)

१९९४: कॅम्लिन उद्योगसमुहाचे संस्थापक काकासाहेब दांडेकर यांचे निधन.

१९९६: वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू कीथ बॉईस यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९४३)

१९९७: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार विपुल कांति साहा यांचे निधन.

१९९९: मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांचे निधन.

२०००: स्कॉटलंड देशाचे पहिले मंत्री डोनाल्ड डेवार यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९३७)

२००२: अभिनेत्री दीना पाठक यांचे निधन.

२००७: भारतीय अध्यात्मिक गुरु चिन्मोय कुमार घोस उर्फ श्री चिन्मोय यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९३१)


ऑक्टोबर

रवि 4 11 18 25
सोम 5 12 19 26
मंगळ 6 13 20 27
बुध 7 14 21 28
गुरु 1 8 15 22 29
शुक्र 2 9 16 23 30
शनि 3 10 17 24 31