घटना


१२९७: स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव.

१७७३: बेंजामिन फ्रँकलिनने रुल्स बाय विच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस्ड टू ए स्मॉल वन हा निबंध प्रकाशित केला.

१७९२: होप हिरा चोरला गेला.

१८९३: स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.

१९०६: म. गांधींनी द. आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.

१९१९: अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले.

१९४१: अमेरिकेने पेंटागॉन बांधायला सुरुवात केली.

१९४२: आझाद हिंद सेनेने जन गण मन राष्ट्रगीत म्हणून गायले.

१९४४: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे ११,५०० नागरिक ठार.

१९६१: विश्व प्रकृती निधी (World Wildlife Fund) ची स्थापना.

१९६५: भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.

१९७२: नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित तरुण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला.

१९९७: नासाचे मार्सग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोहोचले.

२००१: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.

२००७: रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले आहे.


जन्म


१८१६: जर्मन संशोधक कार्ल झाइस यांचा जन्म.

१८६२: इंग्लिश लेखक ओ. हेन्री यांचा जन्म.

१८८४: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सुधीमय प्रामाणिक यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९७४)

१८८५: इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार डी. एच. लॉरेन्स यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १९३०)

१८९५: भूदान चळवळीचे प्रणेते, म.गांधींचे शिष्य आचार्य विनोबा भावे यांचा जन्म. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १९८२)

१९०१: साहित्यिक आत्माराम रावजी देशपांडे तथा कवी अनिल यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९८२)

१९११: भारतीय क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट २०००)

१९१५: भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १९९७)

१९१७: फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९८९)

१९३९: ऍडॉब सिस्टम चे संस्थापक चार्ल्स गेशेके यांचा जन्म.

१९७६: भारतीय क्रिकेटर मुरली कार्तिक यांचा जन्म.

१९८२: तामिळ चित्रपट अभिनेत्री श्रीया शरण यांचा जन्म.


मृत्यू


१८८८: अर्टिजेंनाचे राष्ट्राध्यक्ष दॉमिंगो फॉस्तिनो सार्मियेंतो यांचे निधन.

१९२१: तामिळ साहित्यिक सब्रुमण्यम भारती यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८८२)

१९४८: पाकिस्तानचे प्रणेते बॅ. मुहम्मद अली जिना यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८७६)

१९६४: हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक गजानन मुक्तिबोध यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७)

१९७१: सोव्हिएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १८९४)

१९७३: चिलीचे राष्ट्राध्यक्ष साल्वादोर अॅलेंदे याचं निधन.

१९७३: भारतीय तत्त्वज्ञ आणि गुरू नीम करळी बाबा यांचे निधन.

१९७८: बल्गेरियाचे कवी जॉर्जी मार्कोव्ह यांना फाशी देण्यात आली.

१९८७: हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसनिैक, शिक्षणतज्ज्ञ महादेवी वर्मा यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १९०७)

१९९३: चित्रपट सृष्टीतील अभिनेते अभी भट्टाचार्य यांचे निधन.

१९९८: क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९०९ – अहमदनगर, महाराष्ट्र)

२०११: भारतीय सैनिक व पायलट अंजली गुप्ता यांचे निधन.

 


सप्टेंबर

रवि 6 13 20 27
सोम 7 14 21 28
मंगळ 1 8 15 22 29
बुध 2 9 16 23 30
गुरु 3 10 17 24
शुक्र 4 11 18 25
शनि 5 12 19 26