घटना


५४: नीरो १७व्या वर्षी रोमन सम्राट बनला.

१७७३: चार्ल्स मेसियर यांनी व्हर्लपूल गॅलेक्सीचा शोध लावला.

१८८४: ग्रिनिच जवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानून आंतरराष्ट्रीय मान्यता त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.

१९२३: तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल वरून अंकारा येथे हलवली.

१९२९: पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले.

१९४४: दुसरे महायुद्ध – लाल सैन्याने लाटवियाची राजधानी रिगा जिंकली.

१९४६: फ्रान्सने नवीन संविधान अंगीकारले.

१९७०: फिजीचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९८३: अमेरिटेक मोबाइल कम्युनिकेशन्स (आताची ए.टी. अँड टी) या कंपनीने अमेरिकेतील पहिली सेलफोनची यंत्रणा सुरू केली.

२०१३: मध्य प्रदेश मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११५ जण ठार आणि ११० जण जखमी झाले.


जन्म


१८७७: स्वातंत्र्यसेनानी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते भुलाभाई देसाई यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९४६)

१९११: चित्रपट अभिनेते अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर २००१)

१९२४: भारतीय राजकारणी मोतीरु उदयम यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २००२)

१९२५: ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल २०१३)

१९३६: भारतीय वीणा वादक आणि संगीतकार चित्ती बाबू यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९९६)

१९४१: इंग्लिश क्रिकेटपटू जॉन स्‍नो यांचा जन्म.

१९४३: सऊबर एफ १ चे संस्थापक पीटर सऊबर यांचा जन्म.

१९४८: पाकिस्तानी सूफी गायक नुसरत फतेह अली खान यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १९९७)


मृत्यू


१९६५: डी. डी. टी. या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ पॉल हर्मन म्युलर यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८९९ – ओल्टेन, स्वित्झर्लंड)

१२४०: दिल्ली च्या पहिल्या महिला सुलतान रझिया सुलतान यांचे निधन.

१२८२: जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक निचिरेन यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १२२२)

१९११: स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबल भगिनी निवेदिता यांचे निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर १८६७)

१९३८: पॉपॉय कार्टून चे निर्माते ई. सी. सेगर यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १८९४)

१९४५: द हर्शे चॉकलेट कंपनी चे संस्थापक मिल्टन हर्शे यांचे निधन. (जन्म: १३ सप्टेंबर १८५७)

१९८७: पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक आभास कुमार गांगुली तथा किशोर कुमार यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १९२९)

१९९५: हिन्दी साहित्यिक डॉ. रामेश्वर शुक्ल तथा अंचल यांचे निधन. (जन्म: १ मे १९१५ – किशनपूर, फतेहपूर, उत्तर प्रदेश)

२००१: कुष्ठरोगतज्ज्ञ, नामवंत शल्यचिकित्सक डॉ. जाल मिनोचर मेहता यांचे निधन.

२००३: नोबेल पारितोषिक विजेते केनेडियन भौतिकशास्त्रज्ञ बर्ट्राम ब्रॉकहाउस यांचे निधन.

 


ऑक्टोबर

रवि 4 11 18 25
सोम 5 12 19 26
मंगळ 6 13 20 27
बुध 7 14 21 28
गुरु 1 8 15 22 29
शुक्र 2 9 16 23 30
शनि 3 10 17 24 31