घटना

१६६०: मुघल फौजांनी चाकणचा किल्ला ताब्यात घेतला.

१८६२: कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना.

१८६२: मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना.

१८९३: मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश.

१९४५: दोन अणुबाँबच्या भयावर संहारामुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला.

१९४३: नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय डी. लिट. पदवी दिली.

१९४७: पाकिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.

१९४७: लॉर्ड माउंट बॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक.

१९५८: एअर इंडियाची दिल्ली – मॉस्को विमानसेवा सुरू झाली.

१९७१: बहारीनला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

२००६: श्रीलंकेच्या वायुदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात चेन्चोलाई येथे ६१ तामिळ मुली ठार झाल्या.

२०१०: पहिल्या ’युवा ऑलिम्पिक स्पर्धा’ सिंगापूरमधे घेण्यात आल्या.


जन्म

१७७७: डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १८५१)

१९०७: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या लेखिका. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील गोदावरी परुळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९९६)

१९११: भारतीय तत्त्वज्ञानी वेदतिरी महाऋषी यांचा जन्म.

१९२५: साहित्यिक, नाटककार पत्रकार जयवंत दळवी यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९९४)

१९५७: विनोदी अभिनेता जॉन प्रकाश राव जनुमला ऊर्फ जॉनी लिव्हर यांचा जन्म.

१९६२: पाकिस्तानी क्रिकेटपटू समालोचक रमीझ राजा यांचा जन्म.

१९६८: क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांचा जन्म.


मृत्यू

१९५८: मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट यांचे निधन. (जन्म: १९ मार्च १९००)

१९८४: १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी १९२६)

१९८८: रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर एन्झो फेरारी यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८९८)

२०११: हिन्दी चित्रपट अभिनेते निर्माते शम्मी कपूर यांचे निधन. (जन्म: २१ ऑक्टोबर १९३१)

२०१२: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचे निधन. (जन्म: २६ मे १९४५)

 


ऑगस्ट

रवि 2 9 16 23 30
सोम 3 10 17 24 31
मंगळ 4 11 18 25
बुध 5 12 19 26
गुरु 6 13 20 27
शुक्र 7 14 21 28
शनि 1 8 15 22 29