घटना


१८३१: ग्रॅन कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्‍वेडोर व व्हेनेझुएला असे दोन देश अस्तित्त्वात आले.

१८६९: भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणार्‍या सुएझ कालव्याचे उद्‍घाटन झाले. या कालव्याचे बांधकाम मात्र १० वर्षे आधीच पूर्ण झाले होते.

१९३२: तिसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

१९३३: अमेरिकेने सोविएत युनियनला मान्यता दिली.

१९५०: ल्हामो डोंड्रब हे अधिकृतपणे १४वे दलाई लामा बनले.

१९९२: देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका इंदिराबई हळबे यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.

१९९२: महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.

१९९४: रशियाच्या मीर या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेर्‍या पूर्ण करून नवा विक्रम केला.

१९९६: पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांची अहमदाबादच्या नॅशनल अ‍ॅकेडमी ऑफ सायन्सेस चे फेलो म्हणून निवड.


जन्म


०००९: रोमन सम्राट व्हेस्पासियन यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून ००७९)

१७४९: कॅनिंग चे निर्माते निकोलस एपर्टीट यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १८४१)

१७५५: फ्रान्सचा राजा जन्म लुई (अठरावा) यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १८२४)

१९०१: युरोपियन कमिशनचे पहिले अध्यक्ष वॉल्टर हॉलस्टेन यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १९८२)

१९०६: होंडा मोटर कंपनी चे सहसंस्थापक सोईचिरो होंडा यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९१)

१९२०: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मिथुन गणेशन यांचा जन्म. (मृत्यू: २२ मार्च २००२)

१९२३: केप व्हर्दे देशाचे पहिले अध्यक्ष अरिसिदास परेरा यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर २०११)

१९२५: अमेरिकन अभिनेता रॉक हडसन यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९८५)

१९३२: अभिनेत्री शकुंतला महाजन तथा बेबी शकुंतला यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी २०१५ – कोल्हापूर)

१९३८: लेखक, नाटककार, निर्माते रत्‍नाकर मतकरी यांचा जन्म.

१९८२: भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाण यांचा जन्म.


मृत्यू


१८१२: द टाईम्स वृत्तपत्र चे संस्थापक जॉन वॉल्टर यांचे निधन.

१९२८: स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी लाला लजपतराय यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १८६५)

१९३१: संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १८५३)

१९३५: भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य गोपाळ कृष्ण देवधर यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १८७१)

१९६१: साहित्यिक व समीक्षक कुसुमावती आत्माराम देशपांडे यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १९०४)

२००३: भारतीय गायक सुरजित बिंद्राखिया यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९६२)

२०१२: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १९२६)

२०१२: भारतीय उद्योगपती पॉंटि चड्डा यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १९५७)

२०१५: विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचे निधन.

२०१५: कर्नल संतोष महाडिक कुपवाडा श्रीनगर येथे कोम्बिंग ऑपरेशनचे नेतृत्व करताना शहीद.



 


नोव्हेंबर

रवि 1 8 15 22 29
सोम 2 9 16 23 30
मंगळ 3 10 17 24
बुध 4 11 18 25
गुरु 5 12 19 26
शुक्र 6 13 20 27
शनि 7 14 21 28