घटना


१९१६: पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.

१९२०: म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.

१९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.

१९४५: व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.

१९४६: भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.

१९६०: केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.

१९९९: भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.


जन्म


१८३८:  भारतीय गुरु आणि तत्वज्ञ भक्तिविनाडो ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुन १९१४)

१८५३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ विल्हेल्म ऑस्टवाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९५६)

१८७७: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ फेडरिक सॉडी यांचा जन्म.

१८८६: साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक प्रा. श्रीपाद महादेव माटे तथा श्री. म. माटे यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९५७)

१९२४: केनिया देशाचे राष्ट्राध्यक्ष डॅनियेल अराप मोई यांचा जन्म.

१९३२: स्नॅपल चे संस्थापक अर्नोल्ड ग्रीनबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर २०१२)

१९४१: चित्रपट अभिनेत्री साधना शिवदासानी ऊर्फ साधना यांचा जन्म.

१९५२: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू जिमी कॉनर्स यांचा जन्म.

१९५३: अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री अहमदशाह मसूद यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर २००१)

१९६५: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक पार्थो सेन गुप्ता यांचा जन्म.

१९७१: भारतीय अभिनेते आणि राजकारणी पवन कल्याण यांचा जन्म.

१९८८: भारतीय क्रिकेट खेळाडू इशांत शर्मा यांचा जन्म.

१९८८: भारतीय गायक इश्मीत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००८)


मृत्यू


१५४०: इथियोपियाचा सम्राट दावित (दुसरा) यांचे निधन.

१८६५: आयरिश गणितज्ञ विल्यम रोवन हॅमिल्टन यांचे निधन.

१९३७:  आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती चे स्थापक पियरे डी कौर्तिन  यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८६३)

१९६०: वनस्पतीतज्ञ, विज्ञान वर्धिनी महाराष्ट्र या संस्थेचे संचालक डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचे निधन.

१९६९: व्हिएतनामचे राष्ट्रपती हो ची मिन्ह यांचे निधन. (जन्म: १९ मे १८९०)

१९७६: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कादंबरीकार वि. स. खांडेकर यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १८९८)

१९९०: मराठवाड्याचा चालताबोलता इतिहास अशी ओळख असणारे लेखक न. शे. पोहनेरकर यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९०७)

१९९९: चित्रकार व लेखक डी. डी. रेगे यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९११ – पाचल, राजापूर, रत्‍नागिरी)

२००९: आंध्र प्रदेशचे १४वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे विमान अपघातात निधन. (जन्म: ८ जुलै १९४९)

२०११: संगीतकार श्रीनिवास खळे यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९२६)

२०१४: भारतीय वकील आणि राजकारणी गोपाल निमाजी वाहनवती यांचे निधन. (जन्म: ७ मे १९४९)


सप्टेंबर

रवि 6 13 20 27
सोम 7 14 21 28
मंगळ 1 8 15 22 29
बुध 2 9 16 23 30
गुरु 3 10 17 24
शुक्र 4 11 18 25
शनि 5 12 19 26