घटना


१७८९: न्यूजर्सी अमेरिकेचे पहिले राज्य बनले.

१८७७: थाॅमस अल्वा एडिसन यांनो ग्रामोफोन चा शोध लावला.

१९१७: युक्रेन प्रजासत्ताक बनले.

१९४५: न्युरेम्बर्ग ट्रायल्स – दुसर्‍या महायुद्धातील गुन्ह्यांसाठी २४ जणांवर खटला सुरू झाला.

१९५९: युनायटेड नेशन्सने बालहक्कांच्या घोषणापत्राची दखल घेतली.

१९८५: मायक्रोसॉफ्ट विंडोज १.० प्रकाशीत झाले.

१९९४: भारताची ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड किताबाची मानकरी बनली.

१९९७: अमेरिकेच्या कोलंबिया या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर रवाना झाली.

१९९८: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित.

१९९९: अनाथ आणि निराधार बालकांच्या संगोपनासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा हॅरी होल्ट पुरस्कार लता जोशी यांना जाहीर.

१९९९: आर. जी. जोशी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मोरोपंत पिंगळे यांना जाहीर.

२००८: अमेरिकेतील आर्थिक संकटामुळे डाऊ जोन्स निर्देशांक १९९७ पासुनच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.


जन्म


१६०२: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ ऑट्टो फोन ग्वेरिक यांचा जन्म.

१७५०: म्हैसूर चा राजा शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ टिपू सुलतान यांचा जन्म. (मृत्यू: ४ मे १७९९)

१८५४: कवी, निबंधकार व नाटकाकर मोरो गणेश लोंढे यांचा जन्म.

१८८९: अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९५३)

१८९२: इंसुलिन चे सह्संशोधक जेम्स कॉलिप यांचा जन्म. (मृत्यू:  १९ जून १९६५)

१९०५: संसदपटू, अर्थतज्ञ, घटनापंडित मिनोचर रुस्तुम तथा मिनू मसानी यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९९८)

१९१०: डच भौतिकशास्त्र विलेम जेकब व्हान स्टाॅकम यांचा जन्म.

१९२४: फ्रेंच गणितज्ञ बेनुवा मँडेलब्रॉट यांचा जन्म.

१९२७: न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा जन्म.

१९३९: साहित्यिक वसंत पोतदार यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल २००३ – नाशिक)

१९४१: उर्दू लेखिका हसीना मोईन यांचा जन्म.

१९६३: इंग्लिश गणितज्ञ तिमोथी गॉवर्स यांचा जन्म.

१९६९: अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांचा जन्म.


मृत्यू


१८५९: स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १७७९)

१९०८: बंगालमधील सुप्रसिद्ध क्रांतिकारक कन्हय्यालाल दत्त यांना फाशी.

१९१०: रशियन साहित्यिक लिओ टॉलस्टॉय यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १८२८)

१९५४: सेसेना एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक क्लाइड व्हर्नन सेसेना यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १८७९)

१९७०: ख्यातनाम मराठी संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचे निधन. (जन्म: १४ जुलै १८८४)

१९७३: पत्रकार व समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १८८५)

१९८४: लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १९११)

१९८९: किरण घराण्याच्या प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांचे निधन. (जन्म: १९ मे १९०५ – बडोदा)

१९९७: स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे स्वीय सहाय्यक शांताराम शिवराम तथा आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन.

१९९८: संस्कृतच्या विविध शास्त्रांतील पंडित, प्रख्यात मीमांसक दत्तात्रेयशास्त्री तांबे गुरूजी यांचे निधन.

१९९९: तमाशा कलावंत (सोंगाड्या) दत्ता महाडिक पुणेकर यांचे निधन.

२००३: सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचे पहिले राष्ट्राध्यक्ष डेव्हिड डेको यांचे निधन. (जन्म: २४ मार्च १९३०)

२००७: रोडेशिया देशाचे पहिले पंतप्रधान इयान स्मिथ यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १९१९)


नोव्हेंबर

रवि 1 8 15 22 29
सोम 2 9 16 23 30
मंगळ 3 10 17 24
बुध 4 11 18 25
गुरु 5 12 19 26
शुक्र 6 13 20 27
शनि 7 14 21 28