घटना


१६३९: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास (आताचे चेन्नई) शहराची सुरवात केली.

१८४८: अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.

१९०२: कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना.

१९०२: मोटार वाहना मध्ये फिरणारे थिओडोर रूझवेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती होते.

१९४१: दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला.

१९४२: दुसरे महायुद्ध – ब्राझीलने जर्मनी इटालीविरुद्ध युद्ध पुकारले.

१९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.

१९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.

१९७२: वर्णद्वेषी धोरणाबद्दल झिम्बाब्वे ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.


जन्म


१६४७: प्रेशर कुकर चे निर्माते डेनिस पेपिन यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १७१३)

१८४८: शिकागो डेली न्यूज चे स्थापक मेलविले एलिया स्टोन यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९२९)

१८९३: अमेरिकन लेखक डोरोथी पार्कर यांचा जन्म.

१९०४: सुधारणावादी चिनी नेते डेंग जियाओ पिंग यांचा जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७)

१९१५: बंगाली नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक शंभू मित्रा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९९७)

१९१५: इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे रचनाकार जेम्स हिलियर यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी २००७)

१९१९: हिंदी कवी गिरिजाकुमार माथूर यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १९९४)

१९१८: सामाजिक कार्यकर्त्या डॉ. बानू कोयाजी यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै २००४)

१९२०: हृदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद डॉ. डेंटन कुली यांचा जन्म.

१९३५: कथ्थक शैलीचे नर्तक अभिनेते पंडित गोपीकृष्ण यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९४)

१९५५: अभिनेते आणि केंद्रीय मंत्री चिरंजीवी यांचा जन्म.

१९६४: स्वीडीश टेनिस खेळाडू मॅट्स विलँडर यांचा जन्म.


मृत्यू


१३५०: फ्रान्सचा राजा फिलिप (सहावा) यांचे निधन.

१६०७: लंडन कंपनीची स्थापक बर्थलॉम्व गोस्नेल यांचे निधन.

१८१८: भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १७३२)

१९६७: जन्म नियंत्रण गोळीचे निर्मिते ग्रेगरी गुडविन पिंटस यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १९०३)

१९७८: केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोमोके न्याटा यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १८९३)

१९८०: चित्रपट अभिनेते, निर्माते दिग्दर्शक किशोर साहू यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १९१५)

१९८०: मॅकडोनेल विमानाचे  निर्माते जेम्स स्मिथ मॅकडोनेल यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १८९९)

१९८२: क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१४)

१९८९: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. कृष्णराव शंकर पंडित यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८९३)

१९९५: संगीतकार, ट्रम्पेट व्हायोलिनवादक पं. रामप्रसाद शर्मा यांचे निधन.

१९९९: मराठी चित्रपट रंगभूमीवरील अभिनेते सूर्यकांत मांढरे यांचे निधन.

२०१४: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यू. ए. अनंतमूर्ती यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १९३२)


ऑगस्ट

रवि 2 9 16 23 30
सोम 3 10 17 24 31
मंगळ 4 11 18 25
बुध 5 12 19 26
गुरु 6 13 20 27
शुक्र 7 14 21 28
शनि 1 8 15 22 29