घटना


१६०५: मुघल सम्राट जहांगिर यांचा राज्याभिषेक झाला.

१८५१: विल्यम लसेल यांनी उरेनस ग्रहाच्या अंब्रियाल व अरीयेल चंद्राचा शोध लावला.

१८५७: शेफील्ड एफ.सी. हा जगातील सर्वात जुना फुटबॉल क्लब शेफील्ड, इंग्लँड येथे सुरु झाला.

१९०१: एनी एडसन टेलर हे नायगारा धबधब्यात बॅरल मधून उडी मारणारे पहिले व्यक्ती ठरले.

१९०९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसर्‍याचा उत्सव साजरा केला.

१९४५: संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.

१९४९: युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयाचे काम सुरु झाले.

१९६३: देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.

१९६४: उत्तर र्‍होडेशियाला युनायटेड किंगडमपासुन स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले.

१९७२: दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी सकाळ रिलीफ फंड या संस्थेतर्फे दत्तक बैल योजना सुरू करण्यात आली.

१९८४: भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.

१९९७: सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.

२०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.

२००२: सलमान खान यांचा पुन्हा जमीन मंजूर आणि सुटका.

२००३: कॉनकॉर्ड विमानची शेवटची व्यावसायिक उड्डाण झाली.

२०१६: सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून हकालपट्टी.


जन्म


१६३२: डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ अँथनी व्हॉन लीवेनहॉक यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १७२३)

१७७५: दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १८६२)

१८६८: औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल १९५१)

१८९४: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार विभुद्धभाषण मुखोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १९८७)

१९१०: मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री लीला ऊर्फ माई भालजी पेंढारकर यांचा जन्म.

१९१४: आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुलै २०१२)

१९२१: व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी २०१५)

१९२६: सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर केदारनाथ सहानी यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर २०१२)

१९३५: भारतीय पत्रकार आणि लेखक म्हणून मार्क टुली यांचा जन्म.

१९६३: भारतीय अमेरिकन उद्योगपती अरविंद रघुनाथन यांचा जन्म.

१९७२: अभिनेत्री व मॉडेल रीमा लांबा ऊर्फ मल्लिका शेरावत यांचा जन्म


मृत्यू



१६०१: डच खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १५४६)

१९२२: कॅडबरी चे संस्थापक जॉर्ज कॅडबरी यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १८३९)

१९४४: रेनॉल्ट कंपनी चे संस्थापक लुई रेनॉल्ट यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८७७)

१९७९: अबारथ कंपनी चे संस्थापक कार्लो अबारट यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९०८)

१९९१: स्टार ट्रेक चे निर्माते जीन रोडडेबेरी यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९२१)

१९९१: ऊर्दू कथा व पटकथा लेखिका इस्मत चुगताई यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९१५)

१९९२: मराठी नवकथेचे जनक अरविंद गोखले यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९१९)

१९९५: पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष माधवराव साने यांचे निधन.

२०११: लिस्प प्रोग्रॅमिंग लँग्वेज चे जनक जॉन मॅककार्थी यांचे निधन. (जन्म: ४ सप्टेंबर १९२७)

२०१३: पार्श्वगायक प्रबोधचंद्र तथा मन्ना डे यांचे निधन. (जन्म: १ मे १९१९)

२०१४: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते एस. एस. राजेंद्रन यांचे निधन.


ऑक्टोबर

रवि 4 11 18 25
सोम 5 12 19 26
मंगळ 6 13 20 27
बुध 7 14 21 28
गुरु 1 8 15 22 29
शुक्र 2 9 16 23 30
शनि 3 10 17 24 31