घटना


१४३४:  थेम्स नदी पूर्णपणे गोठली.

१७५०: महाराणी ताराबाईंकडून छत्रपती राजारामास कैद.

१८५९: चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ओरिजिन ऑफ द स्पिशिज प्रकाशित केला.

१८६४: जळगाव नगरपालिकेची स्थापना.

१९४४: दुसरे महायुद्ध – ८८ अमेरिकन विमानांनी टोकियोवर तुफानी बॉम्बवर्षाव केला.

१९६३: जॉन एफ. केनेडी यांचा खून करणाऱ्या ली. हार्वे ऑसवाल्ड याचा डॅलस पोलीस स्थानकात जॅक रुबी ने खून केला.

१९६९: अपोलो-१२ चंद्रावर उतरले.

१९७१: डी. बी. कुपर याने चोरलेल्या २ लाख अमेरिकन डॉलर सह नॉर्थवेस्ट ओरीएंट एरलाईन्सच्या विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली. परंतु कुपारचा अद्याप शोध लागलेला नाही.

१९७६: तुर्कस्तान च्या पूर्व भागात भीषण भूकंप. यात ४ ते ५ हजार लोकांचे निधन.

१९९२: कवी विंदा करंदीकर यांची साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर.

१९९२: वैज्ञानिक संशोधनासाठीचा जी. डी. बिर्ला पुरस्कार हैदराबाद विद्यापीठातील प्राध्यापक गोवर्धन मेहता यांना जाहीर.

१९९२: देवगड तालुक्यातील कवी माधव यांना पहिला कवी माधव पुरस्कार जाहीर.

१९९६: इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा आशुतोष मुकर्जी स्मृती पुरस्कार ख्यातनाम अणूशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांना जाहीर.

१९९८: समाजसेविकांना दिला जाणारा अहल्यादेवी होळकर पुरस्कार आंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना प्रदान.

२०००: भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेपैकी ५४५ किमी भागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी जाहीर केले.


जन्म


१८०६: रग्बी फुटबॉलचे निर्माते विल्यम वेबल एलिस यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १८७२)

१८७७: भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडी) कमिशनर कावसजी जमशेदजी पेटीगरा यांचा जन्म.

१८९४: इंग्लिश क्रिकेटपटू हर्बर्ट सटक्लिफ यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७८)

१९१४: ब्रिटिश शिल्पकार लिन चॅडविक यांचा जन्म. (मृत्यू: २५ एप्रिल २००३)

१९३७: मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार आणि समीक्षक केशव मेश्राम यांचा जन्म.

१९४१: भारतीय-इंग्लिश ड्रमर आणि गीतकार पेट बेस्ट यांचा जन्म.

१९५५: इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बोथम यांचा जन्म.

१९६१: बुकर विजेत्या भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांचा जन्म.


मृत्यू


१६७५: शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १६२१)

१९१६: मॅक्सिम तोफेचे शोधक हिराम मॅक्सिम यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)

१९४८: मदर्स डे च्या संस्थापिका अॅन्ना जर्व्हिस यांचे निधन. (जन्म: १ मे १८६४)

१९६३: महाराष्ट्राचे माजी मुखमंत्री मारोतराव कन्नमवार यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी १९००)

१९६३: राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीचा मारेकरी ली हार्वे ओस्वाल्ड यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १९३९)

२००३: अभिनेत्री टुनटुन यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९२३)

२००४: जगप्रसिद्ध लेखक आर्थर हेली यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९२०)

२०१४: भारतीय राजकारणी मुरली देवरा यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी १९३७)

 


नोव्हेंबर

रवि 1 8 15 22 29
सोम 2 9 16 23 30
मंगळ 3 10 17 24
बुध 4 11 18 25
गुरु 5 12 19 26
शुक्र 6 13 20 27
शनि 7 14 21 28