घटना


१६६४: नेदरलँड्सने न्यू ऍम्स्टरडॅम इंग्लंडच्या हवाली केले.

१८७३: महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

१९३२: पुणे करारावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या.

१९४६: हाँगकाँग येथे कॅथे पॅसिफिक एअरवेज ची स्थापना झाली.

१९४८: होंडा मोटार कंपनीची स्थापना.

१९६०: अणुशक्तीवर चालणाऱ्या यू. एस. एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.

१९७३: गिनी-बिसाऊला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.

१९९४: सॅटॅनिक व्हर्सेस या कादंबरीचे वादग्रस्त लेखक डॉ. सलमान रश्दी यांच्यावरील मृत्युदंडाचा फतवा मागे.

१९९५: मृत्यूंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.

१९९९: कैगा अणूशक्ती प्रकल्पाचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले.

२००७: कर्णधार धोनीच्या नेतृवाखाली भारताने टी-२० विश्वकप जिंकला.

२०१४: मार्स ऑर्बिटरी मिशन (एमओएम) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इसरो) प्रक्षेपण केलेल्या मार्स ऑर्बिटर ने मार्स ची कक्षा ओलांडली.

२०१५: मक्का शहरात हज चालू असताना चेंगराचेंगरीत ७१७ लोक ठार.


जन्म


१५३४: शिखांचे ४ थे गुरू गुरू राम दास यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १५८१)

१५५१: प्रचंड कवी दासो दिगंबर देशपांडे ऊर्फ दासोपंत यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १६१६)

१८६१: भारतीय क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९३६)

१८७०: नीऑन लाईट चे संशोधक जॉर्जेस क्लॉड यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९६०)

१८८९: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक केशवराव त्र्यंबक दाते यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९७१ – मुंबई)

१८९८: प्राच्यविद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६०)

१९०२: इराणी धर्मगुरु आणि राजकारणी रुहोलह खोमेनी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९८९)

१९११: रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉन्स्टंटिन चेरेनेन्को यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च १९८५)

१९१५: चित्रपट व रंगभूमीवरील कलावंत प्रभाकर शंकर मुजूमदार यांचा जन्म.

१९२१: लेखक, समीक्षक व संपादक डॉ. सखाराम गंगाधर मालशे यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९९२)

१९२२: सोबत साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक गजानन वासुदेव तथा ग. वा. बेहेरे यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९८९)

१९२४: अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरू चरणसिंग तोहरा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २००४)

१९२५: भारतीय विज्ञान आणि शैक्षणिक लेखक ऑटो सिंग पेंटल यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर २००४)

१९३६: भारतीय उद्योजिक शिवती आदितन यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २०१३)

१९४०: इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू आरती साहा यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९९४)

१९५०: क्रिकेटपटू आणि समालोचक मोहिंदर अमरनाथ यांचा जन्म.


मृत्यू


१८९६: स्वीडन देशाचे पहिले पंतप्रधान लुईस गेरहार्ड डी गेर यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १८१८)

१९३९: युनिव्हर्सल स्टुडियो चे संस्थापक कार्ल लामेल्स् यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १८६७)

१९९२: १३वे सरन्यायाधीश सर्वमित्र सिकरी यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९०८)

१९९८: बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते, दिग्दर्शक वासुदेव पाळंदे यांचे निधन.

२००२: लेखक, शब्दकोशकार व अनुवादक श्रीपाद जोशी यांचे निधन.

 


सप्टेंबर

रवि 6 13 20 27
सोम 7 14 21 28
मंगळ 1 8 15 22 29
बुध 2 9 16 23 30
गुरु 3 10 17 24
शुक्र 4 11 18 25
शनि 5 12 19 26