घटना


१८६१: टोरांटो स्टॉक एक्सचेंज सुरु झाले.

१९५१: स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली.

१९६२: युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९९४: ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९९: दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे बूकर पारितोषिक दुसर्‍यांदा मिळाले.

२००९: बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.


जन्म


८४०: सफारीड राजघराण्याचे संस्थापक यकब इब्न अल-लेथ अल-सैफर यांचा जन्म.

१८६४: डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १९२०)

१८८१: स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९७३)

१९३७: संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै २०११)

१९४५: अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका अपर्णा सेन यांचा जन्म.


मृत्यू



१६४७: इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक इव्हानजेलिस्टा टॉरिसेली यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १६०८)

१९५५: शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर यांचे निधन. (जन्म: २८ मे १९२१)

१९६०: फर्ग्युसन कंपनी चे संस्थापक हॅरी फर्ग्युसन यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)

१९८०: शायर व गीतकार अब्दूल हयी ऊर्फ साहिर लुधियानवी यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १९२१)

२००३: कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ पांडुरंगशास्त्री आठवले यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९२०)

२००९: अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १९२३)

२०१२: विनोदी अभिनेते जसपाल भट्टी यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९५५)

 


ऑक्टोबर

रवि 4 11 18 25
सोम 5 12 19 26
मंगळ 6 13 20 27
बुध 7 14 21 28
गुरु 1 8 15 22 29
शुक्र 2 9 16 23 30
शनि 3 10 17 24 31