घटना


१४२०: बीजिंगला अधिकृतपणे मिंग साम्राज्याची राजधानी म्हणून नियुक्त केले गेले.

१४९०: क्रिस्टोफर कोलंबस पहिल्या प्रवासानंतर क्युबा मध्ये पोहोचले.

१६३६: अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठाची (Harvard University) स्थापना.

१८८६: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा राष्ट्राला अर्पण केला.

१९०४: पनामा आणि उरुग्वे यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१९२२: बेनिटो मुसोलिनीच्या नेतृत्त्वाखाली ईटलीतील फॅसिस्टांनी रोममधील सरकार उलथवले.

१९४०: दुसरे महायुद्ध – ईटलीने ग्रीसवर हल्ला केला.

१९६९: तारापूर अणूवीज निर्मिती केंद्र सुरू झाले.


जन्म


१८६७: स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबल ऊर्फ भगिनी निवेदिता यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९११)

१८९३: शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर १९७३)

१९३०: हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार लालजी पाण्डेय तथा अंजान यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९९७)

१९५५: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेटस् यांचा जन्म.

१९५५: भारतीय वंशाच्या अमेरिकन कॉर्पोरेट अधिकारी इन्द्रा नूयी यांचा जन्म.

१९५६: ईराणचे ६ वे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अहमदिनेजाद यांचा जन्म.

१९५८: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा जन्म.

१९६७: अमेरिकन अभिनेत्री ज्यूलिया रॉबर्टस यांचा जन्म.

१९७९: युट्यूब चे सहसंस्थापक जावेद करीम यांचा जन्म.


मृत्यू



१६२७: ४ था मुघल सम्राट जहांगीर यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १५६९)

१८११: राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १७७६)

१९००: जर्मन विचारवंत मॅक्स मुल्लर यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १८२३)

१९४४: डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला हेलन व्हाईट यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १८५३)

२००२: एच अँड एम चे संस्थापक इर्लिंग पर्स्सन यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९१७)

२०१०: ग्रीनलँड देशाचे पहिले पंतप्रधान जोनाथन मोट्झफेल्ड यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९३८)

२०१३: भारतीय लेखक राजेंद्र यादव यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९२९)


ऑक्टोबर

रवि 4 11 18 25
सोम 5 12 19 26
मंगळ 6 13 20 27
बुध 7 14 21 28
गुरु 1 8 15 22 29
शुक्र 2 9 16 23 30
शनि 3 10 17 24 31