घटना


१७९६: दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.

१८१८: इलिनॉय अमेरिकेचे २१ वे रान्य बनले.

१८२९: लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली.

१८७०: बॉम्बे म्युच्युअल लाईफ अ‍ॅश्युअरन्स सोसायटी या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.

१९२७: लॉरेल आणि हार्डी यांचा पहिला चित्रपट पुटिंग पॅट ऑन फिलिप्स प्रकाशित झाला.

१९६७: डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.

१९७१: पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.

१९७९: आयातुल्लाह खोमेनी ईराणचे सर्वेसर्वा बनले.

१९८४: भोपाळ वायू दुर्घटना – भोपाळमधील युनियन कार्बाईड या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.

१९९४: जपानमध्ये प्लेस्टेशन रिलीझ करण्यात आले.


जन्म


१७७६: हिज हायनेस राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर १८११)

१८८२: जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस यांचा जन्म. (मृत्यू: १६ एप्रिल १९६६)

१८८४: भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद श्रीवास्तव यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६३)

१८८९: मुझफ्फरनगर बॉम्बस्पोटातील क्रांतिकारक खुदिराम बोस यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट १९०८)

१८९२: कवी माधव केशव काटदरे यांचा जन्म. (मृत्यू: ३ सप्टेंबर १९५८)

१८९४: भारतीय वकील आणि राजकारणी दिवा जिवरतीनम यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९७५)

१९३७: मैथिली लेखक विनोद बिहारी वर्मा यांचा जन्म.

१९४२: एमा मॅगझीनच्या संस्थापीका अॅलिस श्वार्झर यांचा जन्म.


मृत्यू


१५५२: ख्रिस्ती धर्मप्रसारक सेंट फ्रान्सिस झेविअर यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १५०६ – झेविअर, स्पेन)

१८८८: ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट चे निर्माते कार्ल झैस यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १८१६)

१८९४: इंग्लिश लेखक व कवी आर. एल. स्टीव्हनसन यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १८५०)

१९५१: कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १८८०)

१९५६: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: १९ मे १९०८)

१९७९: भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९०५)

२०११: हिंदी चित्रपट अभिनेते देव आनंद यांचे लंडन यथे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९२३)


>

डिसेंबर

रवि 6 13 20 27
सोम 7 14 21 28
मंगळ 1 8 15 22 29
बुध 2 9 16 2330
गुरु 3 10 17 24 31
शुक्र 4 11 18 25
शनि 5 12 19 26