घटना


१९३२: बर्किना फासोच्या वसाहतीचे आयव्हरी कोस्ट, माली व नायजर या राष्ट्रांत विभाजन.

१९४१: इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला.

१९६०: रोम मधील ऑलिम्पिक खेळांमध्ये लाईट हेवीवेट बॉक्सिंग स्पर्धेत मोहम्मद अली यांनी सुवर्ण पदक जिंकले.

१९६१: अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू.

१९६७: ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे ७वे कुलगुरू झाले.

१९७०: इटालियन ग्रांप्रीच्या प्रॅक्टिसमध्ये मारल्याच्या घटनेनंतर मरणोत्तर फॉर्मूला वन वर्ल्ड ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप जिंकणारे जोकेन रांड हे एकमेव ड्रायव्हर ठरले.

१९७२: ब्लॅक सप्टेंबर नावाच्या पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी म्युनिक ऑलिंपिकमधील इस्राएलच्या खेळाडूंना ओलिस ठेवले.

१९७५: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्डवर असफल खुनी हल्ला.

१९७७: व्हॉयेजर १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.

१९८४: एस. टी. एस. ४१-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली.

२०००: ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

२००५: इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे फ्लाईट ०९१ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.


जन्म


११८७: फ्रान्सचा राजा लुई (आठवा) यांचा जन्म. (मृत्यू: ८ नोव्हेंबर १२२६)

१६३८: फ्रान्सचा राजा लुई (चौदावा) यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १७१५)

१८७२: भारतीय वकील आणि राजकारणी व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांचा जन्म. (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९३६)

१८८८: भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९७५)

१८९५: भाषा व इतिहास संशोधक, लेखक अनंत काकबा प्रियोळकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल १९७३)

१९०७: शिक्षणतज्ञ, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक, नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग चे संस्थापक जयंत पांडुरंग तथा जे. पी. नाईक यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९८१)

१९१०: भारतीय क्रिकेट खेळाडू फिरोझ पालिया यांचा जन्म.

१९२०: बालसाहित्यिका लीलावती भागवत यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१३)

१९२८: सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी (मृत्यू: १९ सप्टेंबर २००४)

१९४०: अमेरिकन अभिनेत्री रॅक्वेल वेल्श यांचा जन्म.

१९४६: मूळ भारतीय वंशाचा ब्रिटीश गायक व संगीतकार फ्रेडी मर्क्युरी यांचा जन्म.

१९५४: वेस्ट इंडिजचा क्रिकेट खेळाडू रिचर्ड ऑस्टिन यांचा जन्म.

१९८६: भारतीय क्रिकेटर प्रग्यान ओझा यांचा जन्म.


मृत्यू


१८७७: अमेरिकेतील सू जमातीचा नेता क्रेझी हॉर्स यांचे निधन.

१९०६: ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ लुडविग बोल्टझमन यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १८४४)

१९१८: उद्योगपती सर रतनजी जमसेठजी टाटा यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १८७१)

१८७६: चिली देशाचे पहिले राष्ट्रपती मॅन्युएल ब्लॅनको एन्कालदा यांचे निधन. (जन्म: २१ एप्रिल १७९०)

१९७८: कवी, संवादलेखक, नाटककार व पत्रकार रॉय किणीकर यांचे निधन.

१९९१: हिन्दी कवी, लेखक व उपहासकार शरद जोशी यांचे निधन. (जन्म: २१ मे १९३१)

१९९२: उद्योगपती अतूर संगतानी यांचे निधन.

१९९५: हिंदी व बंगाली चित्रपट सृष्टीतील संगीतकार सलील चौधरी यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १९२२ – चिंगरीपोथा, २४ परगणा, पश्चिम बंगाल)

१९९६: भारतीय बिशप बॅसिल सालदवदोर डिसोझा यांचे निधन. (जन्म: २३ मे १९२६)

१९९७: नोबेल पुरस्कार विजेत्या ऑग्नीस गाँकशा वाजक्शियू उर्फ मदर तेरेसा यांचे निधन. (जन्म: २६ ऑगस्ट १९१०)

२०००: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू रॉय फ्रेड्रिक्स यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १९४२)

२०१५: भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर २०१५)


सप्टेंबर

रवि 6 13 20 27
सोम 7 14 21 28
मंगळ 1 8 15 22 29
बुध 2 9 16 23 30
गुरु 3 10 17 24
शुक्र 4 11 18 25
शनि 5 12 19 26