घटना


१८२५: बाष्पशक्तीवर चालणारे एंटरप्राइज हे भारतात आलेले पहिले जहाज.

१८५६: पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकात्यात झाला.

१९१७: पहिले महायुद्ध – अमेरिकेने ऑस्ट्रिया/हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.

१९३५: प्रभातचा धर्मात्मा हा अस्पृष्योद्धारावरचा चित्रपट मुंबईतील कृष्ण सिनेमात प्रदर्शित झाला.

१९४१: दुसरे महायुद्ध – जपानने पर्ल हार्बरवर तुफानी हल्ला केला.

१९७५: इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.

१९८८: यासर अराफात यांनी इस्त्राएलच्या अस्तित्त्वास मान्यता दिली.

१९९४: कन्‍नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर.

१९९५: फ्रेन्च गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन इन्सॅट-२सी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.

१९९८: ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड.

२०१६: पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्स चे पीके ६६१ विमान कोसळले. यात ४७ लोकांचा मृत्यू.


जन्म


१९०२: भारतीय क्रिकेटपटू जनार्दन नवले यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९७९)

१९२१: स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू प्रमुख स्वामी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट २०१६)

१९५७: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जिऑफ लॉसन यांचा जन्म.


मृत्यू



१८९४: सुएझ कालव्याचे सहनिर्माते फर्डीनंट द लेशप्स यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८०५)

१९४१: कविवर्य भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १८७४)

२००१: प्रसिद्ध कॅमेरामन सुब्रतो मित्रा यांचे निधन.

१९७६: विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ गोवर्धनदास पारेख यांचे निधन.

१९८२: संगीतशिक्षक बाबूराव विजापुरे यांचे निधन. (जन्म: १७ जून १९०३)

१९९३: इव्होरी कोस्ट आयलंडचे पहिले अध्यक्ष फेलिक्स हॉफॉएट-बोजि यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १९०५)

१९९७: ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचे अलाहाबाद येथील अलोपी आश्रमात निधन. (जन्म: १६ जुलै १९१३ – अच्छाती, बस्ती, उत्तर प्रदेश)

२००४: अॅमवे चे सहसंस्थापक जय व्हॅन ऍन्डेल यांचे निधन. (जन्म: ३ जुन १९२४)

२०१३: ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक विनय आपटे यांचे निधन.

२०१६: पाकिस्तानी गायक आणि इस्लाम धर्मप्रचारक जुनैद जमशेद यांचे विमान अपघातात निधन.


>

डिसेंबर

रवि 6 13 20 27
सोम 7 14 21 28
मंगळ 1 8 15 22 29
बुध 2 9 16 2330
गुरु 3 10 17 24 31
शुक्र 4 11 18 25
शनि 5 12 19 26