घटना


१९३२: इंडियन एअर फोर्स अ‍ॅक्ट द्वारे भारतीय वायूदलाची स्थापना झाली.

१९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडचा पश्चिम भाग ताब्यात घेतला.

१९५९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी-लिट पदवी घरी येऊन दिली.

१९६२: अल्जीरीयाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

१९६२: नाट्य निकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित तो मी नव्हेच या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला.

१९७८: ऑस्ट्रेलियाच्या केन वॉर्बीने पाण्यावर ३१७.६० तशी मैल वेगाचा विक्रम केला.

१९८२: पोलंडने सॉलिडॅरिटी व इतर सर्व कामगार संघटनांवर बंदी घातली.

२००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची (Department of Homeland Security) स्थापना केली.

२००५: काश्मीर मध्ये झालेल्या ७.६ रिश्टर भूकंपा मुळे सुमारे ८६,००० – ८७,५०० लोक मृत्युमुखी पडले, ६९,०००- ७२,५०० जण जखमी झाले आणि २.८ दशलक्ष लोक बेघर झाले.


जन्म


१८५०: फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ हेन्‍री लुईस ली चॅटॅलिअर यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर १९३६)

१८८९: डेल्टा एअर लाईन्स चे सहसंस्थापक कॉलेट ई. वूल्मन यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९६६)

१८९१: उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९७५)

१९२२:संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल २००१ – चेन्नई, तामिळनाडू)

१९२४: भारतीय कवि आणि स्कॉलर थिरूनलूर करुणाकरन यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै २००६)

१९२६: जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार ऊर्फ जानी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १९९६)

१९२८: ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू नील हार्वे यांचा जन्म.

१९३०: भारतीय इंग्रजी दिग्दर्शक आणि निर्माता अलेसदैर मिल्ने यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी २०१३)

१९३५: द फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांचा जन्म.

१९६०: नेटफ्लिक्स चे सहसंस्थापक रीड हेस्टिंग्स यांचा जन्म.

१९९३: पशुवैद्यक डॉ. काजल तांबे यांचा जन्म.

१९९७: अमेरिकन अभिनेत्री बेला थोर्न यांचा जन्म.


मृत्यू


१३१७: जपानचे सम्राट फुशिमी यांचे निधन. (जन्म: १० मे १२६५)

१८८८: कवी व संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १८३५ – माहुली, सांगली, महाराष्ट्र)

१९३६: हिन्दी साहित्यिक धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ मुन्शी प्रेमचंद यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १८८०)

१९६७: इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट अ‍ॅटली यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १८८३)

१९७९: स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेतेलोकनायक जयप्रकाश नारायण यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९०२)

१९९६: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका गोदावरी परुळेकर यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १९०७)

१९९८: देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका, कोकणच्या मदर तेरेसा इंदिराबाई हळबे ऊर्फ मावशी यांचे निधन.

२०१२: केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल नवल किशोर शर्मा यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९२५)

२०१२: पत्रकार व पार्श्वगायिका वर्षा भोसले यांचे निधन.

 


ऑक्टोबर

रवि 4 11 18 25
सोम 5 12 19 26
मंगळ 6 13 20 27
बुध 7 14 21 28
गुरु 1 8 15 22 29
शुक्र 2 9 16 23 30
शनि 3 10 17 24 31