घटना


१५४३: नऊ महिने वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली.

१७९१: वॉशिंग्टन डी.सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले.

१८३९: जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र घेतले.

१८५०: कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१वे राज्य बनले.

१९३९: प्रभात कंपनीचा माणूस हा चित्रपट प्रदर्शित झाला.

१९४५: दुसरे चीन जपान युद्ध, जपानने चीनसमोर शरणागती पत्करली.

१९८५: मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.

१९९०: श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे १८४ तामिळींची हत्या केली.

१९९१: ताजिकिस्ता देश सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

१९९७: ७ वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसेना बुद्धिबळातील ग्रँडमास्टर किताब मिळाला.

२००१: व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायरच्या मॉन्सून वेडिंग चित्रपटाला गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.

२००९: ठीक ९ वाजुन ९ मिनिटे व ९ सेकंदांनी दुबई मेट्रोचे उद्‍घाटन झाले.

२०१२:भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या २१ पीएसएलव्ही प्रक्षेपण केले.

२०१५: एलिझाबेथ (दुसरी) युनायटेड किंग्डम वर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली.

२०१६: उत्तर कोरियाने पाचवी अण्वस्त्र चाचणी पूर्ण केली आहे.


जन्म


१८२८: रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९१०)

१८५०: आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक भारतेंदू हरिश्चंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १८८५)

१८९०: केंटुकी फ्राईड चिकन चे संस्थापक कर्नल सँडर्स यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९८०)

१९१०: गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १९९७)

१९०४: भारतीय-पाकिस्तानी हॉकी खेळाडू फिनोझ खान यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल २००५)

१९०५: भारतीय तत्त्वज्ञानी आणि कवी ब्रह्मारीश हुसैन शा यांचा जन्म. (मृत्यू: २४ सप्टेंबर १९८१)

१९०९: अभिनेत्री लीला चिटणीस यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै २००३)

१९४१: अष्टपैलू क्रिकेटपटू अबीद अली यांचा जन्म.

१९४१: सी प्रोग्रामिंग लँग्वेज चे निर्माते डेनिस रिची यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर २०११)

१९५०: संगीतकार श्रीधर फडके यांचा जन्म.

१९७४: कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीरचक्र प्राप्त विक्रम बात्रा यांचा जन्म.


मृत्यू


१४३८: पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १३९१)

१९४२: स्वातंत्र्यसैनिकशिरीष कुमार यांचा गोळी लागून मृत्यू. (जन्म: २८ डिसेंबर १९२६)

१९६०: उर्दू कवी व शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १८९०)

१९७६: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १८९३)

१९७८: वॉर्नर ब्रदर्स चे सहस्थापक जॅक एल. वॉर्नर यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८९२)

१९९४: लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे निधन.

१९९७: युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष आर. एस. भट यांचे निधन.

१९९९: नाटककार व लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे निधन.

२००१: अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री अहमदशाह मसूद यांची हत्या. (जन्म: २ सप्टेंबर १९५३)

२०१०: समाजवादी कामगारनेते, लेखक वसंत नीलकंठ गुप्ते यांचे निधन. (जन्म: ९ मे १९२८)

२०१२: भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूल कंपनीचे संस्थापक व्हर्गिस कुरियन यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९२१ – कोहिकोड, केरळ)

 


सप्टेंबर

रवि 6 13 20 27
सोम 7 14 21 28
मंगळ 1 8 15 22 29
बुध 2 9 16 23 30
गुरु 3 10 17 24
शुक्र 4 11 18 25
शनि 5 12 19 26