घटना


१९०४: चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशांतील सीमा निश्चित केल्या.

१९४७: अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात (पहिल्यांदाच) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१९५०: कृ. भा. बाबर यांनी समाजशिक्षणमाला स्थापन केली.

१९५२: केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत्यांचे अटकसत्र सुरू.

१९६२: चीनने भारतावर आक्रमण केल्या मुळे चीन-भारत युद्धास सुरवात.

१९६९: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना.

१९७०: हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर.

१९७१: मंदीच्या तडाख्यामुळे नेपाळमधील रोखेबाजार कोसळला.

१९७३: सिडनी ऑपेरा हाऊस चे उद्घाटन एलिझाबेथ (दुसरी) यांनी केले.

१९९१: उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.

१९९५: ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स या संस्थेकडून हिन्दी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना मॅन ऑफ द सेंचुरी हा सन्मान जाहीर.

२००१: रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना विष्णुदास भावे गौरवपदक जाहीर.

२०११: लिबीयन गृहयुद्ध – राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.


जन्म


१८५५: गुजराथी लेखक गोवर्धनराम त्रिपाठी यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९०७ – मुंबई)

१८९१: अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक सर जेम्स चॅडविक यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै १९७४)

१८९३: केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोमो केन्याटा यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९७८)

१९१६: लोकशाहीर मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ शाहीर अमर शेख यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९६९)

१९२०: भारतीय वकील आणि राजकारणी सिद्धार्थ शंकर रे यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर २०१०)

१९२७: भारतीय कवी आणि समीक्षक गुंटूर सेशंदर शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २००७)

१९६३: क्रिकेटपटू, समालोचक व खासदार नवजोत सिंग सिद्धू यांचा जन्म.

१९७८: भारतीय फलंदाज वीरेन्द्र सहवाग यांचा जन्म.


मृत्यू


१८९०: ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर सर रिचर्ड बर्टन यांचे निधन. (जन्म: १९ मार्च १८२१)

१९६१: मानववंशशास्त्रज्ञ व्ही. एस. गुहा यांचे निधन.

१९६४: अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूव्हर यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८७४)

१९७४: प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १८९८)

१९८४: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ पॉल डायरॅक यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९०२)

१९९६: पत्रकार, युद्धशास्त्राचे अभ्यासक दि. वि. तथा बंडोपंत गोखले यांचे निधन.

१९९९: समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार माधवराव लिमये यांचे निधन.

२००९: गुप्तहेरकथालेखक वीरसेन आनंदराव तथा बाबा कदम यांचे निधन. (जन्म: ४ मे १९२९)

२०१०: क्रिकेटपटू पार्थसारथी शर्मा यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १९४८)

२०११: लिबीयाचे हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांचे निधन. (जन्म: ७ जून १९४२)

२०१२: पृथ्वी दिनाची सुरवात करणारे जॉन मॅककनेल यांचे निधन. (जन्म: २२ मार्च १९१५)

 


ऑक्टोबर

रवि 4 11 18 25
सोम 5 12 19 26
मंगळ 6 13 20 27
बुध 7 14 21 28
गुरु 1 8 15 22 29
शुक्र 2 9 16 23 30
शनि 3 10 17 24 31