घटना

१७८३: जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे ३५,००० जण मृत्यूमुखी पडले.

१९००: द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी ची स्थापना झाली.

१९१४: बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडे आपणांस सैन्यात दाखल करून घ्यावे असा हिटलरने अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्तीझाली.

१९३६: आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्‍या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.

१९४८: भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.

१९६०: नायजेरिया देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९९४: संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

१९९४: सहज सोप्या व गोड कविता आणि सूक्ष्म व मार्मिक वर्णनात्मक लेख यांद्वारे हिन्दी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना उत्तर प्रदेश सरकारतर्फे विषेश पुरस्कार जाहीर.

२०००: मल्याळी दिग्दर्शक शाजी एन. करुण यांना फ्रेन्च सरकारने नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले.

२००४: राज्यपाल महंमद फझल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्‍घाटन झाले.

जन्म

१८८६: हिंदी कवी मैथिलिशरण गुप्त यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर १९६४)

१८९८: आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार उदयशंकर भट्ट यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६६)

१९००: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, पत्री सरकारचे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १९७६)

१९१६: गीतकार आणि शायर शकील बदायूँनी यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९७० – मुंबई)

१९२४: अमेरिकन कादंबरीकार लिऑन युरिस यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून २००३)

१९३९: भारतीय क्रिकेटपटू अपूर्व सेनगुप्ता यांचा जन्म.

१९५६: १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू बलविंदरसिंग संधू यांचा जन्म.

१९६०: भारतीय क्रिकेटपटू गोपाल शर्मा यांचा जन्म.

१९८४: भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री यांचा जन्म.

मृत्यू

१९२९: फोनोग्राफ चे शोधक एमिल बर्लिनर यांचे निधन. (जन्म: २० मे १८५१)

१९३०: विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८५४)

१९५७: पत्रकार, हिन्दुस्तान टाइम्स चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव देवदास गांधी यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९०० – दरबान, दक्षिण अफ्रिका)

१९९३: अध्यात्मिक गुरू स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: ८ मे १९१६)

२००७: लेखिका सरोजिनी वैद्य यांचे निधन. (जन्म: १५ जून १९३३)


ऑगस्ट

रवि 2 9 16 23 30
सोम 3 10 17 24 31
मंगळ 4 11 18 25
बुध 5 12 19 26
गुरु 6 13 20 27
शुक्र 7 14 21 28
शनि 1 8 15 22 29