घटना


७६२: खलिफा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.

१६२९: इटलीतील नेपल्स शहरात झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० जण मृत्यूमुखी पडले.

१८९८: विल्यम केलॉग यांनी कॉर्नफ्लेक्स विकसित केले.

१९३०: पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला.

१९६२: ट्रान्स कॅनडा हायवे हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.

१९७१: अपोलो १५ चंद्रावर उतरले.

१९९७: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‍भावना पुरस्कार जाहीर.

२०००: चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले.

२०००: कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्‍च न्यायालयाचा निकाल.

२००१: जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

२०१२: दिल्लीतील पावर ग्रिड  खराब झाल्यामुळे उत्तर भारतील 30 कोटी पेक्षा जास्त लोकांची वीज खंडित झाली.

२०१४: पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० ठार.

जन्म

१८१८: इंग्लिश लेखिका एमिली ब्राँट यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १८४८)

१८५५: जर्मन उद्योगपती जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९१९)

१८६३: फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १९४७)

१९४७: ऑस्ट्रियन अमेरिकन शरीरसौष्ठवपटू अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे ३८वे राज्यपाल अर्नोल्ड श्वार्झनेगर यांचा जन्म.

१९५१: भारतीय-इंग्रजी चित्रकार आणि मूर्तिकार गॅरी यहूदा यांचा जन्म.

१९६२: भारतीय दहशतवादी यकब मेमन यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९६२)

१९७३: पार्श्वगायक सोनू निगम यांचा जन्म.

१९८०: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जेम्स अँडरसन यांचा जन्म.


मृत्यू

१६२२: संत तुलसीदास यांनी देहत्याग केले.

१७१८: पेनसिल्व्हेनियाचे स्थापक विल्यम पेन यांचे निधन.

१८९८: जर्मनीचे पहिले चान्सलर ऑटोफोन बिस्मार्क यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १८१५)

१९३०: बार्सिलोना फुटबॉल क्लब चे स्थापक जोन गॅम्पर यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८७७)

१९४७: ऑस्ट्रेलियाचे ६वे पंतप्रधान जोसेफ कूक यांचे निधन.

१९६०: कर्नाटक सिंह स्वातंत्र्यसैनिक गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १८७१)

१९८३: शास्त्रीय नाट्यसंगीत गायक वसंतराव देशपांडे यांचे निधन. (जन्म: २ मे १९२०)

१९९४: मराठी ग्रामीण साहित्यिक, चित्रपट कथालेखक, महामंडळाचे संस्थापक सचिव शंकर पाटील यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९२६)

१९९५: अर्थतज्ञ, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी चे संस्थापक डॉ. विनायक महादेव तथा वि. म. दांडेकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९२०)

१९९७: व्हिएतनामचा राजा बाओडाई यांचे निधन.

२००७: स्विडिश चित्रपट दिग्दर्शक इंगमार बर्गमन यांचे निधन.

२००७: इटालियन चित्रपट दिग्दर्शक मिकेलांजेलो अँतोनियोनी यांचे निधन.

२०११: संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १९३७)

२०१३: भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार बेंजामिन वॉकर यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १९१३)


जुलै

रवि 5 12 19 26
सोम 6 13 20 27
मंगळ 7 14 21 28
बुध 1 8 15 22 29
गुरु 2 9 16 23 30
शुक्र 3 10 17 24 31
शनि 4 11 18 25