घटना


१४९८: पश्चिम गोलार्धात तिसरा प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस हे त्रिनिदाद बेटांचा शोध लावणारे पहिले युपोपीय ठरले.

१६५७: मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.

१६५८: औरंगजेब मुघल सम्राट बनला.

१८५६: न्यूझीलंडची राजधानी ख्राइस्ट चर्चची स्थापना.

१९३७: के. नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला वहाँ हा प्रभातचा चित्रपट मुंबईतील मिनर्व्हा टॉकीजमधे प्रदर्शित झाला.

१९५४: इटालियन गिर्यारोहकांनी के-२ (माउंट गॉडविन ऑस्टिन) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर प्रथमच सर केले.

१९५६: कसोटी सामन्यातील एका डावात सर्व १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर हा पहिला गोलंदाज बनला.

१९६४: रेंजर ७ अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्रे काढले.

१९९२: जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९९२: सतार वादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान.

२०००: वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्राचे डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्कार प्रदान.

२००१: दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू महाराज समता पुरस्कार प्रदान.

२००६: फिदेल कॅस्ट्रो यांनी आपल्या भावाला, राऊल यांच्याकडे सत्ता हस्तगत केली.

२०१२: मायकेल फेल्प्स यांनी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सर्वाधिक पदक जीकाण्याचा विक्रम मोडला.

जन्म

१७०४: स्विस गणिती गॅब्रिअल क्रॅमर यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १७५२)

१८००: जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १८८२)

१८७२: संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार लक्ष्मणरामचंद्र पांगारकर यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर १९४१)

१८८०: हिन्दी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांचा जन्म. (मृत्यू: ८ नोव्हेंबर १९३६)

१८८६: अमेरिकन अ‍ॅनिमेशन चित्रपट निर्माते फ्रेड क्विम्बे यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९६५)

१९०२: व्यंगचित्रकार आणि लेखक केशवा तथा के. शंकर पिल्ले यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १९८९)

१९०७: प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून १९६६)

१९१२: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रिडमन यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर २००६)

१९१८: संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल २०००)

१९१९: भारतीय क्रिकेटपटू हेमू अधिकारी यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००३)

१९४१: गुजरातचे माजी मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट २००४)

१९४७: हिंदी चित्रपट अभिनेत्री मुमताज यांचा जन्म.

१९५४: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मनिवंनान यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून २०१३)

१९६५: हॅरी पॉटर च्या लेखिका जे. के. रोलिंग यांचा जन्म.

१९९२: आहारतज्ज्ञ श्रेया आढाव यांचा जन्म.


मृत्यू

१७५०: पोर्तुगालचा राजा जॉन (पाचवा) यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १६८९)

१८०५: भारतीय सैनिक धीरान चिन्नमलाई यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १७६५)

१८६५: आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेटे यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)

१८७५: अमेरिकेचे १७वे राष्ट्राध्यक्ष अँड्रयू जॉन्सन यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १८०८)

१९४०: भारतीय कार्यकर्ते उधम सिंग यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १८९९)

१९६८: चित्रकार, संस्कृत पंडित पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १८६७)

१९८०: पार्श्वगायक मोहंमद रफी यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १९२४ – कोटला सुलतान सिंग, पंजाब)

२०१४: भारतीय पत्रकार आणि लेखक नबरुण भट्टाचार्य यांचे निधन. (जन्म: २३ जून १९४८)


जुलै

रवि 5 12 19 26
सोम 6 13 20 27
मंगळ 7 14 21 28
बुध 1 8 15 22 29
गुरु 2 9 16 23 30
शुक्र 3 10 17 24 31
शनि 4 11 18 25