दैनंदिन दिनविशेष - १८ जुलै (नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन)

 घटना

६४: रोममध्ये भीषण आग लागुन जवळजवळ सगळे शहर भस्मसात झाले.

१८५२: इंग्लंडमधे निवडणुकांत गुप्त मतदान वापरण्यास सुरूवात झाली.

१८५७: मुंबई विद्यापीठाची स्थापना.

१९२५: अ‍ॅडॉल्फ हिटलर यांनी माइन काम्फ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केले.

१९६८: कॅलिफोर्निया येथे इंटेल (Intel) कंपनीची स्थापना.

१९७६: मॉन्ट्रिअल ऑलिम्पिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत प्रथमच १० पैकी १० गुण मिळवले.

१९८०: भारताने एस. एल. व्ही.-३ या अवकाशयानाद्वारे रोहिणी-१ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले.

१९९६: उद्योगपती गोदरेज यांना जपानचा ऑर्डर ऑफ रायझिंग सन हा पुरस्कार प्रदान केला.

१९९६: तामिळ टायगर्स नी श्रीलंकेचा सैनिक तळ ताब्यात घेऊन सुमारे १२०० जवानांना ठार केले.

जन्म

१६३५: इंग्लिश वैज्ञानिक रॉबर्ट हूक यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १७०३)

१८४८: इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९१५)

१९०९: भारतीय कवी, समीक्षक आणि शैक्षणिक बिश्नु डे यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९८३)

१९१०: भारतीय उद्योजिका दप्तेंद प्रमानिक यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९८९)

१९१८: नोबेल पारितोषिक विजेते दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला तथा मदीबा यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर २०१३)

१९२७: पाकिस्तानी गझलगायक गझलसम्राट मेहदी हसन यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून २०१२)

१९३५: ६९वे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचा जन्म.

१९५०: व्हर्जिन ग्रुपचे स्थापक रिचर्ड ब्रॅन्सन यांचा जन्म.

१९७१: भारतीय गायक-गीतकार आणि अभिनेता सुखविंदर सिंग यांचा जन्म.

१९७२: अभिनेत्री सौंदर्या यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल २००४)

१९८२: अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड २००० विजेती प्रियांका चोप्रा यांचा जन्म.


मृत्यू

१८१७: इंग्लिश लेखिका जेन ऑस्टीन यांचे निधन. (जन्म: १६ डिसेंबर १७७५)

१८९२: पर्यटन व्यवस्थापक थॉमस कूक यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८०८)

१९६९: लेखक, कवी, समाजसुधारक लोकशाहीर अण्णाणाऊ साठे यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १९२०)

१९८९: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक डॉ. गोविंद भट यांचे निधन.

१९९४: ख्यातनाम शिक्षणतज्ञ, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक डॉ. मुनीस रझा यांचे निधन.

२००१: सांगलीच्या राजमाता पद्मिनीराजे माधवराव पटवर्धन यांचे निधन.

२००१: वेस्ट इंडीजचे कसोटीपटू रॉय गिलख्रिस्ट यांचे निधन. (जन्म: २८ जून १९३४)

२०१२: चित्रपट अभिनेते आणि लोकसभा सदस्य राजेश खन्ना यांचे निधन.

२०१३: भारतीय कवी, गीतकार, आणि अभिनेते वाली यांचे निधन. (जन्म: २९ ऑक्टोबर १९३१)


जुलै

रवि 5 12 19 26
सोम 6 13 20 27
मंगळ 7 14 21 28
बुध 1 8 15 22 29
गुरु 2 9 16 23 30
शुक्र 3 10 17 24 31
शनि 4 11 18 25

Post a comment

0 Comments