दैनंदिन दिनविशेष - १६ जुलै

 


घटना

६२२: प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. इस्लामिक हिजरी कॅलेंडरची या दिवसापासून सुरुवात झाली.

१६६१: स्वीडिश बँकेने युरोपमधील पहिल्या नोटा जारी केल्या.

१९३५: ओक्लाहोमा मध्ये जगातील पहिले पार्किंग मीटर बसवण्यात आले.

१९४५: अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी.

१९६५: ईटली व फ्रान्सला जोडणार्‍या माँट ब्लँक बोगद्याचे उद्‍घाटन झाले.

१९६९: चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो-११ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपण.

१९९२: भारताचे ९वे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली.

१९९८: गुजरातमध्ये शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याच्या अधिकाराचा निर्णय.

जन्म

१७७३: ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष सर जोशुआ रेनॉल्ड्स यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १७९२ – लंडन, इंग्लंड)

१९०९: स्वातंत्र्यसेनानी. भारतरत्न (मरणोत्तर) अरुणा आसीफ अली यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १९९६)

१९१३: ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ७ डिसेंबर १९९७ – अलाहाबाद, उत्तर प्रदेश)

१९१४: मराठी साहित्यिक वा. कृ. चोरघडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९९५)

१९१७: नाटककार व लेखक जगदीश चंद्र माथूर यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १९७८)

१९२३: भूदल प्रमुख के. व्ही. कृष्णराव यांचा जन्म.

१९२६: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जीवशास्त्रज्ञ इर्विन रोझ यांचा जन्म.

१९३९: भारतीय अभिनेते आणि निर्माते शृंगी नागराज यांचा जन्म. (मृत्यू: १६ जुलै २०१३)

१९४३: लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी २०१०)

१९६८: भारतीय हॉकी पटू धनराज पिल्ले यांचा जन्म.

१९६८: विकिपीडिया चे सहसंस्थापक लैरी सेन्जर यांचा जन्म.

१९७३: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू शॉन पोलॉक यांचा जन्म.

१९८४: हिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ यांचा जन्म.


मृत्यू

१३४२: हंगेरीचा राजा चार्ल्स (पहिला) यांचे निधन.

१८८२: अब्राहम लिंकन यांची पत्नी मेरीटॉड लिंकन यांचे निधन.

१९८६: इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे तथा वा. सी. बेन्द्रे यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १८९४)

१९९३: रामपूर साहसवान घराण्याचे ख्यालगायक उ. निसार हुसेन खाँ यांचे निधन.

१९९४: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जुलियन श्वाइंगर यांचे निधन.

जुलै

रवि 5 12 19 26
सोम 6 13 20 27
मंगळ 7 14 21 28
बुध 1 8 15 22 29
गुरु 2 9 16 23 30
शुक्र 3 10 17 24 31
शनि 4 11 18 25

Post a comment

0 Comments