घटना


१४०२: तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.

१८०७: निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले.

१८२८: मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.

१८७१: ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला.

१९०३: फोर्ड मोटर कंपनीतून पहिली मोटारगाडी बाहेर पडली.

१९०८: बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदा ची स्थापना झाली.

१९२६: मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.

१९४४: दुसरे महायुद्ध – क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अ‍ॅडॉल्फ हिटलर बचावला.

१९४९: इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले.

१९५२: फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक खेळांना सुरूवात झाली.

१९६०: सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी.

१९६९: नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला.

१९७३: केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.

१९७६: मंगळावर प्रथमच व्हायकिंग-१ हे मानवरहित अंतराळयान उतरले.

१९८९: म्यानमारच्या सरकारने ऑँग सान सू कीला नजरकैदेत टाकले.

२०००: अभिनेते दिलीपकुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार जाहीर.

२०१५: पाच दशकांनंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले.

जन्म

ख्रिस्त पूर्व ३५६: मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून ख्रिस्त पूर्व ३२३)

१८२२: जनुकांची संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडेल यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १८८४)

१८३६: ज्वरमापीचा शोध लावणारे डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९२५ – केंब्रिज, केंब्रिजशायर, इंग्लंड)

१८८९: बीबीसी चे सहसंस्थापक जॉन रीथ यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९७१)

१९११: भारतीय क्रिकेट खेळाडू बाका जिलानी यांचा जन्म.

१९१९: माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी २००८)

१९२१: बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामताप्रसाद यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १९९४)

१९२९: हिन्दी चित्रपट अभिनेता राजेंद्रकुमार यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै १९९९)

१९७६: भारतीय क्रिकेट खेळाडू देबाशिष मोहंती यांचा जन्म.


मृत्यू

१९२२: रशियन गणितज्ञ आंद्रे मार्कोव्ह यांचे निधन.

१९३७: रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १८७४)

१९४३: कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १८८२)

१९५१: जॉर्डनचा राजा अब्दुल्ला (पहिला) यांचे निधन.

१९६५: क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचे निधन. (जन्म: १८ नोव्हेंबर १९१०)

१९७२: अभिनेत्री गीता दत्त यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १९३०)

१९७३: अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ ब्रूस ली यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १९४०)

१९९५: शास्त्रीय गायक शंकरराव बोडस यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९३५)

२०१३: भारतीय राजकारणी खुर्शिद आलम खान यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९१९)


जुलै

रवि 5 12 19 26
सोम 6 13 20 27
मंगळ 7 14 21 28
बुध 1 8 15 22 29
गुरु 2 9 16 23 30
शुक्र 3 10 17 24 31
शनि 4 11 18 25