घटना



१७०७: किंगडम ऑफ इंग्लंड व किंगडम ऑफ स्कॉटलंड मिळून किंगडम  ऑफ ग्रेट ब्रिटन बनवण्यात आले.

१७३९: चिमाजी अप्पाने पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या वसईवर निकराचा हल्ला केला. तीन महिन्याच्या युद्धानंतर वसई मराठ्यांच्या ताब्यात आली.

१८४०: द पेनी ब्लॅक हे पहीले अधिकृत पोस्टेज स्टॅम्प युनायटेड किंगडममध्ये जारी केले गेले.

१८४४: हाँगकाँग पोलिस फोर्स हे जगातील दुसरे आणि आशियातील पहिले आधुनिक पोलिस दल स्थापन झाले.

१८८२: आर्य महिला समाजा ची पं. रमाबाई यांच्या पुढाकाराने पुणे येथे स्थापना झाली.

१८८४: अमेरिकेत कामगारांना एका दिवसात ८ तास कामकाज असावे ह्या मागणीची घोषणा.

१८८६: आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दुसर्‍या बैठकीत पहिल्यांदा साजरा केला.

१८९०: जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.

१८९७: रामकृष्ण मिशन ची सुरूवात स्वामी विवेकानंद यांनी केली.

१९२७: जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.

१९३०: सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.

१९४०: युद्ध सुरू असल्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या.

१९६०: मुंबईसह मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य आणि गुजरात या स्वतंत्र राज्यांचा निर्माण झाला.

१९६०: गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना झाली.

१९६१: क्युबाचे पंतप्रधान फिदेल कॅस्ट्रो यांनी क्यूबा देश समाजवादी राष्ट्र घोषित करून निवडणुका रद्द केल्या.

१९६२: महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.

१९७८: जपान चे नामी उमुरा हे एकटे उत्तर ध्रुवावर पोहोचणारे पहिले मनुष्य आहेत.

१९८३: अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली.

१९९८: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला.

१९९९: नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत एक वर्षावरून अडीच वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा अध्यादेश जारी झाला.

२००९: स्वीडन मध्ये समलिंगी विवाह अधिकृत करण्यात आला.

२०१५: दिनविशेष (www.dinvishesh.com) या संकेत स्थळाची सुरवात.



जन्म



१२१८: जर्मनीचा राजा रुडॉल्फ (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १२९१)

१९१३: अभिनेता बलराज साहनी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल १९७३)

१९१५: हिन्दी साहित्यिक डॉ. रामेश्वर शुक्ल उर्फ अंचल यांचा जन्म. 

१९१९: भारतीय भाषेतील प्रतिभासंपन्न पार्श्वगायक मन्ना डे यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर २०१३)

१९२२: स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि समाजवादी नेते मधु लिमये यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९९५)

१९३२: कर्नाटकचे १६ वे मुख्यमंत्री आणि केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांचा जन्म.

१९४३: नृत्यांगना सोनल मानसिंह यांचा जन्म.

१९४४: केंद्रीय मंत्री आणि आमदार सुरेश कलमाडी यांचा जन्म.

१९७१: भारतीय अभिनेते आणि रेस कार ड्रायव्हर अजित कुमार यांचा जन्म.



मृत्यू



१९४५: जर्मनीचा चॅन्सेलर नाझी नेता जोसेफ गोबेल्स यांचे निधन. (जन्म: २९ ऑक्टोबर १८९७)

१९५८: नाटककार गणेश शिवराम उर्फ नाना जोग यांचे नागपुर येथे निधन.

१९७२: उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १९१५)

१९९३: स्वातंत्र्यसैनिक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते ना. ग. गोरे यांचे निधन. (जन्म: १५ जून १९०७)

२०१३: निखील एकनाथ खडसे यांचे निधन.


>

मे

रवि 3 10 17 24 31
सोम 4 11 18 25
मंगळ 5 12 19 26
बुध 6 13 2027
गुरु 7 14 21 28
शुक्र 1 8 15 22 29
शनि 2 9 16 23 30