घटना



१९१९: इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.

१९७०: अपोलो-१३ यानाचे प्रक्षेपण झाले.

१९७९: युगांडाचे हुकूमशहा इदी अमीन सत्ता सोडून पळून गेले.

१९७६: ऍपल कंपनी चे ऍपल १ हे कॉम्पुटर तयार झाले.

१९८६: हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडेसहा कोटी किलोमीटर अंतरावरून गेला.

१९९२: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.

१९९९: अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.


जन्म



१७५५: कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १८२४)

१७७०: ब्रिटनचे पंतप्रधान जॉर्ज कॅनिंग यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑगस्ट १८२७)

१८२७ : श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९०)

१८६९: कस्तुरबा गांधी यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९४४)

१८८७: चित्रकार जेमिनी रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल १९७२)

१९०४: गायक आणि अभिनेते कुंदनलान सैगल यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९४७)

१९०६: संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक डॉ. सुमित्र मंगेश कत्रे यांचा जन्म.

१९०८: सोनी कंपनी च्या सह्संस्थापक मसारू इबुका यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९९७)

१९३७: लॉनटेनिस खेळाडू रामनाथन कृष्णन यांचा जन्म.

१९५१: अभिनेत्री रोहिणी हटंगडी यांचा जन्म.


मृत्यू




१९२६: अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ आणि कृषितज्ज्ञ ल्यूथर बरबँक यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १८४९)

१९७७: भारतीय लेखक आणि कार्यकर्ते फन्नीश्वर नाथ रेणू यांचे निधन. (जन्म: ४ मार्च १९२१)

२०००: कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९१७)

२००३: टेक्सास इन्स्ट्रूमेंट चे स्थापक सीसिल हॉवर्ड ग्रीन यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १९००)

२००९: भारतीय लेखक व नाटककार विष्णु प्रभाकर यांचे  निधन. (जन्म: २१ जून १९१२)

२०१५: भारतीय लष्करचे जनरल लेफ्टनंट हनुतसिंग राठोड यांचे निधन.(जन्म: ६ जुलै १९३३)


>

एप्रिल

रवि 5 12 19 26
सोम 6 13 20 27
मंगळ 7 14 21 28
बुध 1 8 15 2229
गुरु 2 9 16 23 30
शुक्र 3 10 17 24
शनि 4 11 18 25