घटना
१७०५: सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली.
१९१५: महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.
१९३१: सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी देण्यात आली.
१९३६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा.
१९९७: सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला बाया कर्वे पुरस्कार प्रदान.
२००५: राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना.
२००६: हज यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३६२ यात्रेकरुंचा मृत्यू.
जन्म
१५९८: राजमाता जिजाऊ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १६७४)
१८५४: विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट १९३०)
१८६३: भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे नरेन्द्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९०२)
१८९३: जर्मन नाझी हर्मन गोअरिंग यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर १९४६)
१८९९: नोबेल पारितोषिक विजेते स्विस रसायनशास्त्रज्ञ पॉल हर्मन म्युलर यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९६५ – बेसल, स्वित्झर्लंड)
१९०२: महर्षी न्यायरत्न धोंडीराजशास्त्री विनोद यांचा जन्म. (मृत्यू: १३ जुलै १९६९)
१९०६: भारतीय संस्कुतीकोशाचे संपादक महादेवशास्त्री जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर १९९२)
१९१७: महर्षी महेश योगी यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी २००८)
१९१८: ज्येष्ठ संगीतकार सी. रामचंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९८२)
१९४९: भारतीय राजकारणी आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेत ७ वेळा आमदार पारसनाथ यादव यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून २०२०)
मृत्यू
१९४४: लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, चित्रशाळेचे विश्वस्त वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी यांचे निधन. (जन्म: २८ एप्रिल १८५४)
१९६६: स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी १८९६)
१९७६: इंग्लिश रहस्यकथालेखिका अॅगाथा ख्रिस्ती यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १८९०)
१९९२: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १९२४)
१९९७: हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक व अभिनेते ओ. पी. रल्हन यांचे निधन.
२००५: ज्येष्ठ हिंदी चित्रपट कलावंत अमरीश पुरी यांचे निधन. (जन्म: २२ जून १९३२ – लाहोर, पंजाब, पाकिस्तान)
0 Comments