घटना



१८९६: जे.टी. हर्न प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारा पहिला खेळाडू झाला.

१८९८: फिलिपाइन्सने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.

१९०५: गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली.

१९१३: जॉन ब्रे या अमेरिकन माणसाची जगातील पहिली कार्टून फिल्म.

१९४०: दुसरे महायुद्ध – १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.

१९४२: अॅन फ्रॅंक यांना तेराव्या वाढदिवसासाठी एक डायरी मिळाली.

१९४४: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी वापरलेला पहिला फ्लाईंग बॉब लंडनवर आदळला.

१९६४: वर्णद्वेषाविरोधात लढणारे नेते नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

१९७५: अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.

१९९३: पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.

१९९६: भारतीय पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.

२००१: कोनेरु हंपी ही बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची व एकुणात दुसरी खेळाडू आहे.


जन्म



४९९: भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा जन्म.

१८९४: बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक पुरुषोत्तम बापट यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९१)

१९१७: लेखक व पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून २०१२)

१९२४: अमेरिकेचे ४१ वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचा जन्म.

१९२९: जर्मन छळछावणीत मरण पावलेली मुलगी अ‍ॅना फ्रँक यांचा जन्म.

१९१७: लेखक पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म.

१९५७: पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू प्रशिक्षक जावेद मियाँदाद यांचा जन्म.

१९८५: मोझीला फायरफॉक्स चे सहसंस्थापक ब्लॅक रॉस यांचा जन्म.


मृत्यू




१९६४: मराठी भाषेचे गाढे अभ्यासक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १८९२ – इस्लामपूर, सांगली)

१९७८: चिनी भाषेमधील कवी, लेखक आणि इतिहासकार गुओ मोरुओ यांचे निधन.

१९८१: भारताचे ७ वे सरन्यायाधीश प्र. बा. गजेंद्रगडकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९०१)

१९८३: कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री नॉर्मा शिअरर यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९०२)

२०००: मराठी लेखक, कवी, नाटककार आणि अभिनेता पु.ल. देशपांडे यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९१९)

२००३: हॉलीवूड अभिनेता ग्रेगरी पेक यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९१६)

२०१५: भारतीय मूर्तिकार नेकचंद सैनी यांचे निधन.(जन्म: १५ डिसेंबर १९२४)

२०२०: भारतीय राजकारणी आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेत ७ वेळा आमदार पारसनाथ यादव यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९४९) 

२०२०: उर्दू कवी, अभ्यासक आणि पत्रकार आनंद मोहन झुत्शी गुलजार देहलावी यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १९२६)


>

जून

रवि 7 14 21 28
सोम 1 8 15 22 29
मंगळ 2 9 16 23 30
बुध 3 10 17 24
गुरु 4 11 18 25
शुक्र 5 12 19 26
शनि 6 13 20 27