घटना



१६९९: गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.

१७३१: छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.

१८४९: हंगेरी देश प्रजासत्ताक बनला.

१९१९: जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.

१९४२: व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.

१९६०: अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह  प्रक्षेपित केला.

१९९७: मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.


जन्म



१७४३: अमेरिकेचे ३रे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १८२६)

१८९५: भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९७८)

१९०५: इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचा जन्म.

१९०६: आयरिश लेखक, नाटककार आणि कवी सॅम्युअल बेकेट यांचा जन्म.

१९२२: टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९९)

१९४०: राज्यसभा सदस्य नजमा हेपतुल्ला यांचा जन्म.

१९५६: अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा जन्म.

१९६३: रशियन बुद्धिबळपटू गॅरी कास्पारॉव्ह यांचा जन्म.


मृत्यू



१९५१: औंध संस्थानचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १८६८)

१९७३: अभिनेता दिग्दर्शक बलराज सहानी यांचे निधन. (जन्म: १ मे १९१३)

१९७३: भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक अनंत काकबा प्रियोळकर यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १८९५)

१९८८: महाराष्ट्र केसरी हिरामण बनकर यांचे निधन.

१९९९: कृषितज्ज्ञ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले यांचे निधन.

२०००: चित्रपट निर्माते व वितरक बाळासाहेब सरपोतदार यांचे निधन.

२००८: संगीतकार दशरथ पुजारी यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९३० – बडोदा, गुजराथ)




>

एप्रिल

रवि 5 12 19 26
सोम 6 13 20 27
मंगळ 7 14 21 28
बुध 1 8 15 2229
गुरु 2 9 16 23 30
शुक्र 3 10 17 24
शनि 4 11 18 25