घटना



१६३०: आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्‍हाणपूर येथे पोहोचला.

१६६८: स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

१७३९: कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.

१९६०: फ्रांसने पहिली परमाणुबॉम्बची चाचणी केली.

१९८४: युरी आन्द्रेपॉव्ह यांच्यानंतर कॉन्स्टान्टीन चेरेनेन्को सोविएत संघाचे अध्यक्ष झाले.

१९८८: कॅनडात कॅल्गारी येथे १५वे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.

२००३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.

२०१०: पुणे येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात १७ ठार, ६० जखमी.


जन्म



१७६६: प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्थस यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १८३४)

१८३५: अहमदिया पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचा जन्म. (मृत्यू: २६ मे १९०८)

१८७९: प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १९४९)

१८९४: इतिहासकार वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जुलै १९८६)

१९१०: वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा दत्तमहाराज कवीश्वर यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९९९)

१९११: लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९८४)

१९४५: अभिनेता विनोद मेहरा यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९०)


मृत्यू



१८८३: जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक रिचर्ड वॅग्‍नर यांचे निधन. (जन्म: २२ मे १८१३)

१९०१: गायक नट लक्ष्मण बापूजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १८६३)

१९६८: संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक गोपाळकृष्ण भोबे यांचे निधन.

१९७४: इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक सूर रंग उस्ताद अमीर खॉं यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९१२)

२००८: हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील विनोदी अभिनेते राजेन्द्र नाथ यांचे निधन.

२०१२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार यांचे निधन. (जन्म: १६ जून १९३६)




>

फेब्रुवारी

रवि 2 9 16 23
सोम 3 10 17 24
मंगळ 4 11 18 25
बुध 5 12 1926
गुरु 6 13 20 27
शुक् 7 14 21 28
शनि 1 8 15 22 29