घटना



१६३१: ताजमहाल जिच्या साठी बांधला ती मुमताज बाळाला जन्म देताना मरण पावली.

१८८५: न्यू यॉर्क बंदरमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे आगमन झाले.

१९४०: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी फ्रान्समधुन माघार घेण्यास सुरूवात केली.

१९४४: आइसलँडने (डेन्मार्कपासून) स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.

१९६३: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.

१९६७: चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.

१९९१: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.

२०१३: भारताच्या उत्तराखंड राज्यात ढगफुटी होऊन एका दिवसात १३ इंच पाऊस पडला. शेकडो व्यक्ती मृत्युमुखी, हजारो यात्रेकरी अडकले.


जन्म



१२३९: इंग्लंडचा राजा एडवर्ड (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै १३०७)

१७०४: फ्लाइंग शटल चे शोधक जॉन के यांचा जन्म.

१८६७: लघुलेखन पद्धतीचा शोधक जॉनरॉबर्ट ग्रेग यांचा जन्म.

१८९८: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल हेर्मान यांचा जन्म.

१९०३: संगीतशिक्षक बाबूराव विजापुरे यांचा जन्म. (मृत्यू: ७ डिसेंबर १९८२)

१९०३: चॉकोलेट चिप कुकी चे निर्माते रुथ ग्रेव्हस वेकफिल्ड यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १९७७)

१९२०: नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ फ्रांस्वा जेकब यांचा जन्म.

१९७३: भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस यांचा जन्म.

१९८१: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉटसन यांचा जन्म.


मृत्यू



१६३१: शाहजहानची पत्नी मुमताज महल यांचे  निधन. (जन्म: २७ एप्रिल १५९३)

१२९७: ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला. (जन्म: २९ जानेवारी १२७४)

१६७४: राजमाता जिजाबाई यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १५९८)

१८९३: भारताचे १४ वे राज्यपाल जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांचे  निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १७७४)

१८९५: थोर समाजसुधारक गोपाल गणेश आगरकर यांचा दारिद्र्य आणि दमा या विकाराने मृत्यु. (जन्म: १४ जुलै १८५६)

१९२८: ओरिसातील समाजसुधारक गोपबंधूदास तथा उत्कलमणी यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १८७७)

१९६५: अभिनेते मोतीलाल राजवंश ऊर्फ मोतीलाल यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९१०)

१९८३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक शरद पिळगावकर यांचे निधन.

१९९६: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १९१५)

२००४: सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती पारीख यांचे निधन.


>

जून

रवि 7 14 21 28
सोम 1 8 15 22 29
मंगळ 2 9 16 23 30
बुध 3 10 17 24
गुरु 4 11 18 25
शुक्र 5 12 19 26
शनि 6 13 20 27