.


घटना



१९५७: व्हॅनगार्ड-१ या अमेरिकेच्या पहिल्या सौरउर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.

१९६९: गोल्ड मायर ह्या इस्रायेलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.

१९९७: मुंबई मध्ये वातानुकुलीत टॅक्सी सेवेला सुरवात झाली.


जन्म



१८६४: भारतीय अभियंता जोसेफ बाप्टीस्ता यांचा जन्म.

१९०९: भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००१)

१९२०: बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट १९७५)

१९२७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र विश्वास यांचा जन्म.

१९७५: भारतीय अभिनेता, गायक पुनीथ राजकुमार यांचा जन्म.

१९७९: अभिनेता शर्मन जोशी यांचा जन्म.


मृत्यू



१२१०: आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येन्द्रनाथ (मच्छिंद्रनाथ) यांनी सातारा जिल्ह्यात मत्स्येन्द्रगड येथे समाधी घेतली.

१७८२: डच गणितज्ञ डॅनियल बर्नोली यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १७००)

१८८२: आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे निधन. (जन्म: २० मे १८५०)

१९१०: समाजसेविका अनुताई वाघ यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १९९२)

१९३७: बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १८९१)

१९५६: नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ आयरिन क्यूरी यांचे निधन. (जन्म: १२ सप्टेंबर १८९७)

१९५७: फिलिपाइन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १९०७)

२०००: पार्श्वगायिका व अभिनेत्री राजकुमारी दुबे यांचे निधन.


>

मार्च

रवि 1 8 15 22 29
सोम 2 9 16 23 30
मंगळ 3 10 17 24 31
बुध 4 11 18 25
गुरु 5 12 19 26
शुक्र 6 13 20 27
शनि 7 14 21 28