घटना
१७७८: कॅप्टन जेम्स कूक हे हवाई बेटांवर पोचणारे पहिले युरोपियन ठरले.
१९११: युजीन बी. इलाय यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.
१९५६: संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईमध्ये गोळीबार. यात १० लोक ठार, २५० जखमी, दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू लावण्यात आला.
१९६४: न्यूयॉर्क येथे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन झाले.
१९७४: इजिप्त व इस्त्राएल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या.
१९९७: नॉर्वेच्या बोर्ग औसलँडने एकट्याने अटलांटिक महासागर पार केला.
१९९८: मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९९: नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
२००५: एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.
जन्म
१७९३: महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १८४७)
१८४२: न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९०९)
१८५४: अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचा मदतनीस तसेच त्यांचा पहिल्या दुरध्वनी संभाषणातील भागीदार थॉमस वाॅॅॅटसन यांचा जन्म.
१८८९: नाट्यछटाकार शंकर काशिनाथ गर्गे उर्फ दिवाकर यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑक्टोबर १९३१)
१८८९: कन्नड कवी व विचारवंत देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १९७५ – बंगळुरू, कर्नाटक)
१८९२: अमेरिकन अभिनेता ऑलिव्हर हार्डी यांचा जन्म.
१९३३: अमेरिकन संशोधक रे डॉल्बी यांचा जन्म.
१९३३: भारताचे २७ वे सरन्यायाधीश जगदीश शरण वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल २०१३)
१९३७: आयरिश नोबेल पीस पुरस्कार विजेते राजकारणी जॉन ह्यूम यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट २०२०)
१९५२: चंदन तस्कर वीरप्पन यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर २००४)
१९६६: रशियन बुद्धिबळपटू अलेक्झांडर खलिफमान यांचा जन्म.
१९७२: भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांचा जन्म.
१९९५: साहित्यिक, कवी आणि शिक्षणतज्ज्ञ वि. द. घाटे यांचा जन्म.
मृत्यू
१९३६: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांचे निधन. (जन्म: ३० डिसेंबर १८६५)
१९४७: भारतीय अभिनेता आणि गायक के. एल. सैगल उर्फ कुंदनलाल सैगल यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १९०४)
१९६७: कृषितज्ज्ञ डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन.
१९७१: भारीतय वकील आणि संसद सदस्य बॅरीस्टर नाथ पै यांचे निधन.
१९९३: कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचे निधन. (जन्म: १२ मे १९०५)
१९९६: अभिनेते आणि राजकीय नेते एन. टी. रामाराव यांचे निधन. (जन्म: २८ मे १९२३)
२००३: हिंदी साहित्यिक आणि कवी हरिवंशराय बच्चन यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १९०७)
0 Comments