घटना



१७७०: प्रसिद्ध दर्यावर्दी सागर संशोधक कॅप्टन जेम्स कूक यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.

१९३९: अ‍ॅडॉल्फ हिटलरचा ५० वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुटी देऊन साजरा करण्यात आला.

१९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांनी लाइपझिग शहराचा ताबा घेतला.

१९४६: राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.

२००८: डॅनिका पॅट्रिक ह्या  इंडी कार रेस जिंकण्याच्या पहिल्या महिला चालक झाल्या.


जन्म



७८८: आदि शंकराचार्य यांचा जन्म.

१७४९: मराठा सत्तेचा ध्वज अटकेपार नेणार्‍या पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवर स्थापना केली.

१८०८: फ्रान्सचे पहिले अध्यक्ष नेपोलियन (तिसरे) यांचा जन्म. (मृत्यू: ९ जानेवारी १८७३)

१८८९: नाझी हुकूमशहा तसेच दुसऱ्या महायुद्धाचा प्रारंभ करणारे अ‍ॅडॉल्फ हिटलर यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल १९४५)

१८९६: सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचा माहीम, ठाणे येथे जन्म. (मृत्यू: ९ जुलै १९६८)

१९१४: ज्ञानपीठ विजेते ओरिया साहित्यिक गोपीनाथ मोहंती यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९९१)

१९३९: ध्रुपद गायक सईदुद्दीन डागर यांचा जन्म.

१९५०: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा जन्म.

१९६६: याहू चे सहसंस्थापक डेव्हिड फिलो यांचा जन्म.

१९८०: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक अरीन पॉल यांचा जन्म.


मृत्यू



१९१८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन यांचे निधन. (जन्म: ६ जून १८५०)

१९३८: न्यायाधीश व कायदेपंडित चिंतामणराव वैद्य यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १८६१)

१९६०: बासरीवादक संगीतकार पन्नालाल घोष यांचे निधन. (जन्म: २४ जुलै १९११)

१९७०: गीतकार आणि शायर शकील बदायूँनी याचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १९१६ – बदायूँ, उत्तर प्रदेश)

१९९९:रुचिरा पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई कृष्णाजी ओगले याचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९१३)


>

एप्रिल

रवि 5 12 19 26
सोम 6 13 20 27
मंगळ 7 14 21 28
बुध 1 8 15 2229
गुरु 2 9 16 23 30
शुक्र 3 10 17 24
शनि 4 11 18 25