घटना




१८८१: वॉशिंग्टन (डी. सी.) येथे अमेरिकन रेड क्रॉस ची स्थापना झाली.

१९०४: पॅरिसमध्ये फेड्रेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (फिफा) ची स्थापना झाली.

१९२७: चार्ल्स लिंडबर्ग यांनी एकट्याने जगातील पहिले  न थांबता अटलांटिक महासागर पार करणारे उड्डाण पूर्ण केले.

१९३२: अमेलिया इअरहार्ट ह्या अटलांटिक महासागर एकटयाने पार करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.

१९९१: पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर येथे आत्मघातकी पथकाने हत्या केली.

१९९२: चीनने १,००० किलो टन क्षमतेच्या अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुस्फोट आहे.

१९९४: ४३ व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस इंडिया सुश्मिता सेनने मिस युनिव्हर्स हा किताब पटकावला. हा किताब मिळवणारी ती पहिलीच भारतीय आहे.

१९९६: सांगली जिल्ह्यातील माधवराव पाटील हे ब्रिटन मधील इलिंग शहराचे महापौर झाले.


जन्म




१९१६: अमेरिकन कादंबरीकार हेरॉल्ड रॉबिन्स यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९७)

१९२३: स्विस गणितज्ञ अर्मांड बोरेल यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट २००३)

१९२८: कला समीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१०)

१९३१: हिन्दी कवी, लेखक व उपहासकार शरद जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९१)

१९५६: अभिनेता रविन्र्द मंकणी यांचा जन्म.

१९५८: भारतीय-अमेरिकन फॅशन डिझायनर नइम खान यांचा जन्म.

१९६०: दक्षिण भारतीय अभिनेता मोहनलाल यांचा जन्म.


मृत्यू




१४७१: इंग्लंडचा राजा हेन्‍री (सहावा) यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १४२१)

१६८६: वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थवैज्ञानिक ऑटो व्हॉन गॅरिक यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १६०२)

१९७९: स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १८९३)

१९९१: भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या. (जन्म: २० ऑगस्ट १९४४)

१९९८: इंटकचे सोलापुरातील नेते आबासाहेब बाबूराव किल्लेदार यांचे निधन.

२०००: हर्बालाइफ कंपनी चे स्थापक मार्क आर. ह्यूजेस यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९५६)


>

मे

रवि 3 10 17 24 31
सोम 4 11 18 25
मंगळ 5 12 19 26
बुध 6 13 2027
गुरु 7 14 21 28
शुक्र 1 8 15 22 29
शनि 2 9 16 23 30