घटना



१०५६: क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट झाला.

१९४८: अरब-इस्त्रायल युद्ध – अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.

१९७०: पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

१९७७: टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी प्रथम ऑप्टिकल फाइबरचा वापर केला गेला.

१९९७: राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ओमप्रकाश भसीन पुरस्कार जाहीर करण्यात आला.

२००६: प्रवीण महाजन यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर कौटुंबिक वादातून गोळ्या झाडल्या.


जन्म



१६९८: नाथपरंपरेतील एका शाखेचे प्रमुख सत्पुरुष शिवदिननाथ यांचा जन्म.

१७२४: जर्मन तत्त्ववेत्ता एमॅन्युएल कांट यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी १८०४)

१८१२: भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे डलहौसी यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १८६०)

१८७०: रशियन क्रांतिकारक व्लादिमीर लेनिन यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९२४)

१९०४: अणुबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांचा जन्म.  (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९६७)

१९१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता बलदेव राज चोपडा यांचा जन्म.  (मृत्यू: ५ नोव्हेंबर २००८)

१९१६: अभिनेत्री आणि गायिका काननदेवी यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १९९२)

१९१६: व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक यहुदी मेन्युहीन यांचा जन्म. (मृत्यू: १२ मार्च १९९९)

१९२९: चित्रपट रंगभूमी आणि अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ उषा किरण यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च २००० – नाशिक)

१९२९: भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक प्रा. अशोक केळकर यांचा जन्म.

१९३५: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक भामा श्रीनिवासन यांचा जन्म.

१९४५: भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी गोपाळकृष्ण गांधी यांचा जन्म.


मृत्यू



१९३३: रोल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक हेन्री रॉयस यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १८६३)

१९८०: जर्मन भौतिकशात्रज्ञ फ्रिट्झ स्ट्रासमान यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १९०२)

१९९४: विचारवंत, समाजसुधारक आचार्य सुशीलमुनी महाराज यांचे निधन.

१९९४: अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे निधन. (जन्म: ९ जानेवारी १९१३)

२००३: पंजाबी नाटककार, दिग्दर्शक आणि कादंबरीकार बळवंत गार्गी यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९१६ – भटिंडा, पंजाब)

२०१३: व्हायोलीन वादक, संगीतकार आणि गायक लालगुडी जयरामन यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९३०)

२०१३: भारताचे २७ वे सरन्यायाधीश जगदीश शरण वर्मा यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १९३३)


>

एप्रिल

रवि 5 12 19 26
सोम 6 13 20 27
मंगळ 7 14 21 28
बुध 1 8 15 2229
गुरु 2 9 16 23 30
शुक्र 3 10 17 24
शनि 4 11 18 25