घटना



१८१९: स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.

१९४२: दुसरे महायुद्ध – फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडुन पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला.

१९४८: झेकोस्लोव्हाकिया मध्ये कम्युनिस्ट क्रांती.

१९५८: इजिप्त आणि सीरिया या देशांनी एकत्र येऊन युनायटेड अरब प्रजासत्ताक तयार केले.

१९७८: श्री. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९७९: सेंट लुशिया ला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.


जन्म



१७३२: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १७९९)

१८३६: महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्‍न भट्टाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १९०६)

१८५७: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्‍रिच हर्ट्‌झ यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १८९४)

१८५७: बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९४१)

१९०२: जर्मन भौतिकशात्रज्ञ फ्रिट्झ स्ट्रासमान यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल १९८०)

१९२०: चरित्र अभिनेता इफ्तिखार यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च १९९५)

१९२२: व्हायोलिनवादक व्ही. जी. जोग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २००४)

१९६४: मॉर्टल कोमबॅट व्हिडिओ गेमचे निर्माते एड बून यांचा जन्म.

१९७५: अमेरिकन अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता ड्रिव बॅरीमोर यांचा जन्म.


मृत्यू



१८१५: हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन टेनांट यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १७६१)

१८२७: चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक चार्ल्स विल्सन पील अमेरिकन यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १७४१)

१९२५: ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट यांचे निधन. (जन्म: २० जुलै १८३६ – ड्युजबरी, यॉर्कशायर, इंग्लंड)

१९४४: कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन. (जन्म: ११ एप्रिल १८६९)

१९५८: स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न मौलाना अबूल कलाम आझाद यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)

१९८२: ऊर्दू कवी जोश मलिहाबादी यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १८९४)

२०००: लेखक व पत्रकार विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९२८)

२०००: प्रकाशक, श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९२३)

२००९: लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १९४३)


>

फेब्रुवारी

रवि 2 9 16 23
सोम 3 10 17 24
मंगळ 4 11 18 25
बुध 5 12 1926
गुरु 6 13 20 27
शुक् 7 14 21 28
शनि 1 8 15 22 29