घटना



१९०१: राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला.

१९२४: रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.

१९४७: भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर झाली.

१९६३: डेहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन केले.

१९७१: सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

१९९९: ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स व त्याच्या दोन मुलांची ओरिसाच्या केओंझार जिल्ह्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.

२००१: आय. एन. एस. मुंबई ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात दाखल झाली.

२०१५: बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची स्थापना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपत हरियाणा येथे झाली.


जन्म



१५६१: इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी सर फ्रँन्सिस बेकन यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल १६२६)

१८९६: कवी सुर्यकांत त्रिपाठी उर्फ निशाला यांचा जन्म.

१८९९: हिंदुस्तानी संगीतज्ज्ञ दिलीप कुमार रॉय यांचा जन्म.

१९०१: भारतीय मानवशास्रज्ञ निर्मलकुमार बोस यांचा जन्म.

१९०९: संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस यू. थांट यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९७४)

१९११: मराठी लेखक अनिरुद्ध घनश्याम रेळे यांचा जन्म.

१९१६: गुजराथी लेखक आणि कवी हरीलाल उपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी १९९४)

१९१६: बंगाली आणि हिंदी चित्रपट दिगदर्शक आणि पटकथा लेखक सत्येन बोस यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९९३)

१९२०: संतसाहित्याचे अभ्यासक प्रा. ह. श्री. शेणोलीकर यांचा जन्म.

१९२२: मराठी लेखिका शांता बुध्दिसागर यांचा जन्म.

१९३४: हिंदी चित्रपट निर्माते आणि दिगदर्शक विजय आनंद यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)

१९२०: संतसाहित्याचे अभ्यासक प्रा. ह. श्री. शेणोलीकर यांचा जन्म.


मृत्यू



१२९७: योगी चांगदेव यांनी समाधी घेतली.

१६६६: ५ वे मुघल सम्राट शहाजहान यांचे आपल्याच मुलाच्या (औरंगजेब) कैदेत १० वर्षे राहिल्यानंतर निधन. (जन्म: ५ जानेवारी १५९२)

१६८२: समर्थ रामदास स्वामी यांचे निधन.

१७९९: ऑस्ट्रीयन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक होरॅस बेनेडिट्ट डी सास्युरे यांचे निधन.

१९०१: ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य करणारी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचे निधन. (जन्म: २४ मे १८१९)

१९२२: शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते बायर फिद्रिक यांचे निधन.

१९६७: क्रांतिकारक, दिद्वान, कृषितज्ज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टीचे शिल्पकार डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८८४)

१९७२: राजनीतिज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९०३)

१९७३: अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९०८)

१९७५: केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १८९४)

१९७८: इंग्लिश क्रिकेटपटू हर्बर्ट सटक्लिफ यांचे निधन. (जन्म: २४ नोव्हेंबर १८९४)

१९९९: ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स आणि त्याच्या दोन मुलांची ओदिशाच्या केओंझोर जिल्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.




>

जानेवारी

रवि 5 12 19 26
सोम 6 13 20 27
मंगळ 7 14 21 28
बुध 1 8 15 2229
गुरु 2 9 16 23 30
शुक्र 3 10 17 24 31
शनि 4 11 18 25