घटना



१७५७: प्लासी येथे रॉबर्ट क्लाइव्हच्या ३,००० सैन्याने सिराज उद्दौलाच्या ५०,००० सैन्याचा फितुरी घडवून पराभव केला.

१८६८: क्रिस्टोफर लॅथम शॉल्स यांना टाईप-राइटर च्या शोधासाठी पेटंट मिळाले.

१८९४: पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली.

१९२७: भारतीय नभोवाणी मुंबई येथे सुरु.

१९६९: आय.बी.एम. ने जाहीर केले की जानेवारी १९९७ पासून सॉफ्टवेअर आणि इतर सेवांची किंमत वेगवेगळी होईल त्यामुळे आधुनिक सॉफ्टवेअर उद्योग सुरु झाला.

१९७९: इंग्लंडला ९२ धावांनी हरवून वेस्ट इंडीजने दुसरा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला.

१९८५: दहशतवादी बॉम्बचा एअर इंडियाच्या कनिष्क बोइंग ७४७ विमानात स्फोट. ३२९ ठार.

१९९६: शेखहसीना वाजेद बांगलादेशच्या पंतप्रधानपदी नेमले.

१९९८: दुसर्‍या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली यू. एस. एस. मिसुरी ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.

२०१६: युनायटेड किंग्डम ने ५२% ते ४८% मतदान होऊन युरोपियन युनियनला सोडले.


जन्म



१७६३: फ्रान्सची सम्राज्ञी जोसेफिन यांचा जन्म.

१८७७: भारतीय-इंग्लिश अभिनेते नॉर्मन प्रिचर्ड यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९२९)

१९०१: क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९२७)

१९०६: नेपाळचे राजे वीर विक्रम शाह त्रिभुवन यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १९५५)

१९१२: इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ अ‍ॅलन ट्युरिंग यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९५४)

१९१६: इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन हटन यांचा जन्म. (मृत्यू: ६ सप्टेंबर १९९०)

१९३५: मराठी लेखक राम कोलारकर यांचा जन्म.

१९३६: ग्रीक पंतप्रधान कॉस्टास सिमिटिस यांचा जन्म.

१९४२: दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा जन्म.

१९७२: फ्रेंच फुटबॉलपटू झिनेदिन झिदान यांचा जन्म.

१९८०: वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू रामनरेश सरवण यांचा जन्म.


मृत्यू



००७९: रोमन सम्राट व्हेस्पासियन यांचे निधन. (जन्म: १७ नोव्हेंबर ०००९)

१७६१: बाळाजी बाजीराव तथानानासाहेब पेशवे यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १७२१)

१८३६: स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ जेम्स मिल यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १७७३)

१८९१: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विल्यम एडवर्ड वेबर यांचे निधन.

१९१४: भारतीय गुरु आणि तत्वज्ञ भक्तिविनाडो ठाकूर यांचे निधन. (जन्म: २ सप्टेंबर १८३८)

१९३९: आधुनिक बालशिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते गिजुभाई बधेका यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १८८५ – चितल, अमरेली, गुजराथ)

१९५३: भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामप्रसाद मुखर्जी यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९०१)

१९७५: भारतीय भूसेना प्रमुख जनरल प्राणनाथ थापर यांचे निधन.

१९८०: भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न व्ही. व्ही. गिरी यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८९४)

१९८०: इंदिरा गांधी यांचा मुलगा संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन. (जन्म: १४ डिसेंबर १९४६)

१९८२: बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांना ऑर्गनची साथ करणारे गंधर्व नाटकमंडळीतील नामवंत कलाकार हरिभाऊ देशपांडे यांचे निधन.

१९९०: चरित्र अभिनेते हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १८९८ – हैदराबाद, आंध्र प्रदेश)

१९९४: नाटककार, साहित्यिक वसंतशांताराम देसाई यांचे निधन.

१९९५: पोलिओची लस शोधणारे शास्त्रज्ञ डॉ. जोनस साॅक यांचे निधन.

१९९६: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रे लिंडवॉल यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९२१)

२००५: साहित्यिक डॉ. हे. वि. इनामदार यांचे निधन.

२०१५: भारतीय नन, वकील, आणि समाजसेवक निर्मला जोशी यांचे निधन. (जन्म: २३ जुलै १९३४)

२०२०: पद्मश्री पुरस्कार विजेते डोंगरी भाषेतील साहित्याबद्दल इंग्रजीतील पहिले प्रकाशन केलेले लेखक निलंबर देव शर्मा यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९३१)


>

जून

रवि 7 14 21 28
सोम 1 8 15 22 29
मंगळ 2 9 16 23 30
बुध 3 10 17 24
गुरु 4 11 18 25
शुक्र 5 12 19 26
शनि 6 13 20 27