घटना


१६७०: राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म.

१८२२: जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्‍घाटन झाले.

१९१८: इस्टोनिया देशाला रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९२०: नाझी पार्टीची स्थापना झाली.

१९३८: ड्यु पाँ कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली.

१९४२: व्हॉइस ऑफ अमेरिका या रेडिओ केन्द्राचे प्रसारण सुरू झाले.

१९५२: कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.

१९६१: मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.

१९८७: इयान शेल्डन या शास्त्रज्ञाने मॅगॅलेनिक नक्षत्रपुंजात १९८७ – ए या तेजस्वी तेजोमेघाचा शोध लावला. तेव्हा तो पृथ्वीपासून १,६८,००० प्रकाशवर्षे दूर होता.

२००८: फिडेल कॅस्ट्रो 32 वर्षांनी क्युबा च्या अध्यक्ष पदावरून निवृत्त झाले.

२०१०: एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.


जन्म



१६७०: मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम, शिवाजी महाराजांचे चिरंजीव यांचा जन्म.

१९२४: पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा तलत महमूद यांचा जन्म. 

१९३८: नायके इन्क चे सहसंस्थापक फिल नाइट यांचा जन्म.

१९३९: चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक जॉय मुखर्जी यांचा जन्म. 

१९४२: भारतीय तत्त्वज्ञानी गायत्री चक्रवर्ती यांचा जन्म.

१९४८: राजकारणी आणि दक्षिणेतील अभिनेत्री जे. जयललिता यांचा जन्म. 

१९५५: अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचा जन्म. 


मृत्यू



१६७४: कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी वेडात मराठे वीर दौडले सात हे काव्य लिहिले आहे.

१८१०: हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ हेन्‍री कॅव्हँडिश यांचे निधन. 

१८१५: अमेरिकन अभियंते व संशोधक रॉबर्ट फुल्टन यांचे निधन.

१९३६: मराठी साहित्यिक लक्ष्मीबाई टिळक यांचे निधन.

१९७५: सोविएत युनियनचे अध्यक्ष निकोलाय बुल्गानिन यांचे निधन. 

१९८६  भरतनाट्यम नर्तिका रुक्मिणीदेवी अरुंडेल यांचे निधन.

१९९८: अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या ललिता पवार यांचे निधन.

२०११: अमर चित्र कथा चे जनक अनंत पै ऊर्फ अंकल पै यांचे निधन.


>

फेब्रुवारी

रवि 2 9 16 23
सोम 3 10 17 24
मंगळ 4 11 18 25
बुध 5 12 1926
गुरु 6 13 20 27
शुक् 7 14 21 28
शनि 1 8 15 22 29