घटना



१८५९: सुएझ कालव्याची पायाभरणी झाली.

१९०१: स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट सक्तीचे करणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले.

१९५३: डी. एन. ए. रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोधनिबंध नेचर मासिकात प्रकाशित झाला.

१९६६: एका भूकंपामुळे ताश्कंद शहराचा मोठ्या प्रमाणावर विनाश झाला.

१९८३: पायोनिअर-१० हे अंतराळयान सूर्यमालेच्या पलीकडे गेले.

१९८९: श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या ३,३०,००० तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.

२०००: वादग्रस्त आलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली.

२०१५: ७.८ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे नेपाळ देशात ९१०० जण मारले गेले.


जन्म



१२१४: फ्रान्सचा राजा लुई (नववा) यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १२७०)

१८७४: रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९३७)

१९१८: हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च १९९३)

१९४०: हॉलिवूडमधील अभिनेता अल पचिनो यांचा जन्म.

१९६१: अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक करण राझदान यांचा जन्म.

१९६१: भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि लेखक दिनेश डिसोझा यांचा जन्म.

१९६४: भारतीय राजकारणी आर. पी. एन. सिंग यांचा जन्म.


मृत्यू



१९९९: साहित्यिक पंढरीनाथ रेगे यांचे निधन.

२००२: लाटव्हियाच्या योगशिक्षिका इंद्रा देवी यांचे निधन. (जन्म: १२ मे १८९९)

२००३: ब्रिटिश शिल्पकार लिन चॅडविक यांचे निधन. (जन्म: २४ नोव्हेंबर १९१४)

२००५: भारतीय साधू आणि शिक्षक स्वामी रंगनाथानंद यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १९०८)


>

एप्रिल

रवि 5 12 19 26
सोम 6 13 20 27
मंगळ 7 14 21 28
बुध 1 8 15 2229
गुरु 2 9 16 23 30
शुक्र 3 10 17 24
शनि 4 11 18 25